दिंडोरी शहरातील नाशिक कळवण राज्य मार्गाला लागून निळवंडी रस्त्यावर पंचायत समिती कार्यालय असून, या ठिकाणी शासकीय कामानिमित्त रोज राजकीय व सर्व सामान्य नागरिकांची वर्दळ असते व त्याच प्रमाणे या मार्गावर श्री स्वामी समर्थ केंद्र असल्याने राज्यभरातून भाविक भक्त येत असतात; परंतु तालुक्याचे ठिकाण असलेल्या दिंडोरी शहरातील रस्त्याची ही अवस्था पाहून नाराजी व्यक्त होत आहे. निळवंडी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पायी ये-जा करणारे नागरिक व लगतच्या व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्याने खड्डे लक्षात येत नसल्याने अनेकदा मोटारसायकलस्वारांचे छोटे-मोठे अपघात याठिकाणी होत आहेत. सदर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात तात्पुरते मुरुम टाकून डागडूजी न करता कायमस्वरूपी नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
फोटो - १७ निलवंडी रोड
दिंडोरी शहरातील निळवंडी रस्त्याची झालेली दुरवस्था.
170921\17nsk_26_17092021_13.jpg
दिंडोरी शहरातील निळवंडी रस्त्याची झालेली दुरावस्था.