सातपूर : नाशिक इंडस्ट्रीयल अॅण्ड मॅन्युफॅक्चर असोसिएशन (निमा) या उद्योजकांच्या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात आणि शांततेत पार पडली. या सभेतच नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला.निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश वैश्य, निमाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, तसेच विरल ठक्कर, निवडणूक समितीचे अध्यक्ष व्ही. के. भुतानी, माजी अध्यक्ष रवि वर्मा, मंगेश पाटणकर आदि उपस्थित होते. यावेळी सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर बिनविरोध झालेल्या निवडणुकीचा अधिकृत निकाल या सभेत घोषित करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी झालेल्या चर्चेत मधुकर ब्राह्मणकर, अभय कुलकर्णी, धनंजय बेळे, देवेंद्र बापट, संतोष मंडलेचा, नीलिमा पाटील, एन. टी. अहिरे, मनीष कोठारी, व्हीनस वाणी, समीर पटवा, सुभाष छोरिया आदिंनी चर्चेत भाग घेतला. यावेळी उदय खरोटे, संदीप सोनार, उन्मेष कुलकर्णी, उदय रकिबे, मोहन सुतार आदिंसह कार्यकरिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार मंगेश पाटणकर यांनी मानले. (वार्ताहर)
निमाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे
By admin | Published: August 01, 2016 12:47 AM