लोकमत न्यूज नेटवर्कसातपूर : औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.असे आश्वासन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी निमा पदाधिकाऱ्यांना दिले.नाशिक विभागाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार रंजना पगारे यांनी हाती घेतल्यानंतर त्या निमा पदाधिकाºयांशी बोलत होत्या.पगारे यांनी सांगितले की, उद्योजकांचे जे प्रलंबित प्रश्न आपल्या अखत्यारीत आहेत ते त्वरित सोडविण्यात येतील.परंतु जे विषय धोरणात्मक आहेत ते मुख्यालयात पाठविण्यात येतील.सद्यस्थितीत वेबिनारच्या माध्यमातून समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल असेही आश्वासन त्यांनी दिले.तर सध्याच्या वीजवितरण व वीजदेयक, वीजदरवाढ,सध्याची मागणी यावर निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास आहेर, रावसाहेब रकिबे, सदस्य संजय महाजन आदींनी सखोल चर्चा केली.निमाच्या वतीने त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
निमा पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्य अभियंत्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 11:37 PM
सातपूर : औद्योगिक ग्राहकांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यावर भर दिला जाईल.असे आश्वासन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे नाशिक विभागाचे मुख्य अभियंता रंजना पगारे यांनी निमा पदाधिकाऱ्यांना दिले.
ठळक मुद्देधोरणात्मक आहेत ते मुख्यालयात पाठविण्यात येतील.