या पावसात बाबासाहेब बाळनाथ लभडे यांची गट. नं. १९१ मधील दहा गुंठे मिरची भुईसपाट झाली.
शनिवारी दुपारी चारच्या सुमारास १५ ते २० मिनिटे आलेल्या जोरदार वादळाने व सुमारे अर्धा तास पाऊस सुरू असल्याने कारल्याची बाग जमीनदोस्त झाली.
लभडे यांनी या शेतात खरबुजासह बांबूचा आधार देऊन कारल्याची लागवड केली होती. खरबुजाचे उत्पादन घेऊन अडीच-तीन महिन्यांपूर्वी त्यांनी एकरभर क्षेत्रात कारल्याचे पीक लावले होते. नुकतेच या वेलींना कारले येऊन रोज शंभरच्या आसपास दर्जेदार कारल्याचे कॅरेट विक्रीसाठी निघत होते.
सध्या सुमारे दोनशे ते तीनशे रुपयाचा दर मिळत असल्याने हे पीक कोरोनाच्या काळात लभडे
यांच्यासाठी चार पैसे देणार होते. त्यामुळे त्यांना खरिपाच्या पेरणीसाठी मदतही होणार असताना त्याला निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. कृषी सहायक तुषार शेळके यांनी कौतिक लभडे यांचा १ लाख ८० हजार तर व विठाबाई लभडे यांचा २ लाख २० हजार नुकसानीचा पंचनामा केला आहे.
फोटो- ३० निमगाव मढ रेन
निमगाव मढ येथील शेतकरी कौतिक लभडे यांच्या भुईसपाट कारल्याच्या भागाचा पंचनामा करताना कृषी सहायक तुषार शेळके, उपस्थित माजी सरपंच नवनाथ लभडे.
===Photopath===
300521\30nsk_27_30052021_13.jpg
===Caption===
फोटो- ३० िनमगाव मढ रेन निमगाव मढ येथील शेतकरी कौतिक लभडे यांच्या भुईसपाट कारल्याच्या भागाचा पंचनामा करताना कृषी सहाय्यक तुषार शेळके,उपस्थित माजी सरपंच नवनाथ लभडे.