दिंडोरी : कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी दिंडोरी शहरात किराणा व्यापारी व नगरपंचायतीने एकत्र येत सुमारे ९० हजारांच्या गुटखा, तंबाखू, मिस्री आदी पदार्थांची होळी केली. थुंकीतून कोरोनोचा संसर्ग होऊ नये या उदात्त हेतूने यासाठी सर्व किराणा व्यापाऱ्यांनी तंबाखूमुक्त दिंडोरी करण्याचा संकल्प सोडला आहे.दिंडोरी शहरात अजून करोनाचा शिरकाव झालेला नाही. प्रतिबंधासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरून कामे करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग थुंकीतून होत असतो. थुंकीसाठी कारणीभूत ठरणाºया तंबाखु, गुटखा, मिस्री या पदार्थांची विक्र ी थोड्याफार प्रमाणात होत होती. कुणी थुंकून करोना संसर्गास कारणीभूत होऊ नये, यांसाठी सर्व किराणा व्यापाऱ्यांनी एकत्र येत विचारविनिमय केला. दुकानातील तंबाखू, गुटखा, मिस्त्री, सिगारेट, विडी आदी पदार्थ एकत्रित जमा केले. या सर्व पदार्थांची किंमत ९० हजार रु पयांच्या आसपास होती. येथील श्रीरामनगर येथे हे पदार्थ नेण्यात आले. मुख्याधिकारी डॉ. पाटील यांनी दिंडोरी कोरोना संसर्गमुक्त रहावे या नगरपंचायतीच्या प्रयत्नांना किराणा व्यापारी असोसिएशनने साथ दिल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी राजेश बुरड, रवि जाधव यांनी व्यापाºयांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कोरोनामुक्तीसाठी ंिदंडोरी झाले तंबाखूमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 1:41 AM