घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे मोटारसायकल चोरीचे सत्र रोखण्यासाठी घोटी पोलिसांसमोर आव्हान होते. अखेर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली होती. रात्री पेट्रोलिंग करताना एक तरुण विना नंबर प्लेटची गाडी सिन्नर फाटा या ठिकाणाहून जात असताना त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच विविध गुन्ह्यांची कबुली इगतपुरी तालुक्यातील खैरगावची खडकवाडी येथील आरोपी सुमित सुनील कडू (१९) याने दिली. त्याच्याकडून नऊ वाहने हस्तगत करण्यात आली असून, आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, वाडीवऱ्हे या ठिकाणी मोटारसायकल चोरी होत असल्याने घोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी रात्रीची गस्त वाढवून यंत्रणा कामाला लावली होती. चोरांच्या मुसक्या आवळण्यासंबंधी तपासाची सूत्रे फिरवीत असताना घोटीत संशयास्पद वाटल्याने व गुप्त माहितीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेऊन तपासाची सूत्रे वेगाने हलविली. त्यात संशयिताकडून जवळपास नऊ मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. या मोटारसायकल चोरीमध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता असल्याने आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. अधिक तपास घोटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक शद्धा घनदास, पोलीस उपनिरीक्षक संजय कवडे, सहायक उपनिरीक्षक अनिल धुमसे, शीतल गायकवाड, प्रकाश कासार, रमेश चव्हाण, संदीप मथुरे, शरद कोठुळे, भास्कर शेळके आदी करीत आहेत.
-----------------
नाशकातूनही गाड्या जप्त
घोटी पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या नऊ मोटारसायकलींपैकी घोटी पोलीस ठाण्यात चोरीचे २ गुन्हे दाखल असून, ३ जप्त केल्या आहेत. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल असून, त्यातील २ जप्त केल्या आहेत. सरकारवाडा व अंबड, नाशिक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका गुन्ह्याची नोंद असून, त्या गाड्या जप्त केल्या आहेत. चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून, त्यामधून नऊ मोटारसायकली हीरो होंडा प्लस, हीरो होंडा स्प्लेंडर, हीरो होंडा शाइन, या गाड्यांचा समावेश आहे.
(२२ घोटी चोर)
220921\22nsk_34_22092021_13.jpg
२२ घोटी चोर