नाशिक- बेडसची वेळीच न होणारी उपलब्धता आणि अन्य अडचणींमुळे आता कोरोना बाधीत घरच्याघरीच स्वतंत्र राहूून उपचारावर भर देत आहे. सध्या शहरात साडे नऊशे नागरीकांनी घरीच रूग्णालयाप्रमाणे राहून उपचार सुरू केली आहे.वैद्यकिय नियमानुसार गृह विलगीकरणाची सोय असली तरी बहुतांशी नागरीकांनी नाईलाजामुळे हा पर्याय स्विकारला आहे. ्रकोरोनाचे संकट आढळल्यानंतर सुरूवातील एक रूग्ण सापडला तरी त्याला विलगीकरणात ठेवले जात असे. रूग्णालयात वैद्यकिय उपचार देतानाही स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आले होते. त्यावेळी संसर्ग टाळण्यासाठी हा एक पर्याय होता. नंतर मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयसीएमआरचे नियम वेळोवेळी बदलण्यात आले. त्यानंतर ज्यांच्याकडे घरातच स्वतंत्र राहण्यासाठी खोली असेल आणि त्याला अॅटेच प्रसाधन गृह असेल अशा रूग्णांनाच गृहविलगीकरणासाठी परवानगी देण्यात आली. शहरात जुलै महिन्यापासून रूग्णसंख्या वाढत गेली. त्यानंतर देखील महापालिकेने वडाळा, शिवाजीवाडी, फुले नगर आणि क्रांती नगर या भागात रूग्ण संख्या वाढली तरी गरजेनुसार कोविड सेंटर तयार केले. परंतु दाट वस्तीत संसर्ग वाढण्याची भीती लक्षात घेऊन त्यांना गृहविलगीकरणास परवानगी दिली नव्हती. आता मात्र,नागरीक सर्रास गृहविलगीकरणाचापयार्य निवडत आहेत.मध्यंतरी महापालिकेने प्रभागाप्रभागात राबवलेल्या अॅँटीजेन चाचण्यानंतर रूग्ण संख्या इतकी प्रचंड वाढली की, रूग्णालयात जागा मिळणे कठीण झाले. आर्थिकदृट्या परवडेल त्याला खासगी रूग्णालय आणि गोरगरीबांना महापालिकेचे रूग्णालये असा पर्याय तयार करण्यात आला. तथापि, आता आर्थिक सधन वर्ग किंवा तीव्र लक्षणं असलेले रूग्ण वगळले तर अनेक रूग्णांनी गृहविलगीकरणाचाच पर्याय निवडला आहे. रूग्णालयातील अडचणींपेक्षा घरीच उपचार करण्यावर भर दिला जात आहे. अनेक खासगी डॉक्टर्स देखील यासंदर्भात मार्गदर्शन करून गृहविलगीकरणातील रूग्णांना उपचार करण्यास मदत करीत आहेत.नाशिक विभागातील पाच जिल्'ांचा विचार केला तर सध्या ३३ हजार २५७ रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. नाशिक जिल्'ातील ९५० रूग्णांचा त्यात समावेश आहे.तर धोकादायक ठरू शकतेगृहविलगीकरणात कुटूंबियांना संसर्ग होऊ न देण्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य नियमांचे पालन आवश्यक आहे. मात्र, गृहविलगीकरणाचे नियम धाब्यावर बसवून अनेक बाधीत शहरात फिरत असल्याने संसर्ग वाढू शकतो. महापालिकेने आताहातावर कोरंटाईनचे शिक्के मारणे बंद केल्याने बाधीताला ओळखणे कठीण झाले आहे. मालेगाव येथे गृहविलगीकरणात असलेले रूग्ण बाहेर फिरताना आढळले आहेत.यासंदर्भात कृषी मंत्री दादा भुसे यांनी रविवारी (दि.१३) मालेगाव येथे बैठक घेतली आणि गृहविलगीकरणातील बाधीत रस्त्यांवर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.