मुंबई-आग्रा महामार्गावर पाचोरे फाट्यावर रंगत हॉटेलसमोर बुधवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी एम.एच. १५ जीएफ ०४०२ या क्रमांकाची खासगी मारुती ओमिनी व्हॅन मालेगावाहून नाशिककडे भरधाव वेगाने जात असताना व्हॅनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे रंगत हॉटेलसमोर गाडी अचानक पलटी झाली. त्यामुळे गाडीने तीन ते चार पलटी मारल्या. काही जण गाडीच्या फाटकामधून बाहेर पाऊस चालू असल्यामुळे दीड फूट पाण्यामध्ये फेकले गेले व काही जखमी प्रवासी गाडीतून बाहेर काढले. असे एकूण गाडीतील नऊ जण प्रवासी डोक्याला तसेच हातापायांना मार लागल्यामुळे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये भागाबाई मोरे, ललिता मोरे, कुसुम मोरे, प्रताप मोरे, अवनी मोरे, प्राची मोरे (राहणार कंदाणे, तालुका सटाणा) व सुनंदा मोरे, खंडू मोरे व राहुल माळी (राहणार चौंदाणे, तालुका सटाणा) आदींचा समावेश आहे. (२२ शिरवाडे वणी)
220921\22nsk_15_22092021_13.jpg
२२ शिरवाडे वणी