नाशिक : शहरातील नावदरवाजा येथील तीन मजली, जुन्या इमारतीत बुधवार (दि. ९) सकाळी साडेदहा ते गुरुवारी (दि. १०) रात्रीपर्यंत अज्ञात चोरट्याने घराचे छत तोडून घरफोडी करून ९ लाख ८१ हजार रुपयाचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचे मालक योग शिक्षक औरंगाबादकर हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरीला गेलेले असताना त्यांच्या घरी मोठी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादकर बाहेरगावी असल्यामुळे त्यांचा भाचा मंदार वडनेरकर यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याने तीन मजली इमारतीचे छत तोडून आत प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ९ लाख ८१ रुपयाचा ऐवज चोरून नेला आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे तसेच सहायक पोलीस आयुक्त दीपाली खन्ना यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, इमारतीचे मूळ मालक औरंगाबादकर हे रत्नागिरीला असल्याने त्यांचा भाचा मंदार वडनेरकर यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
===Photopath===
100621\10nsk_38_10062021_13.jpg
===Caption===
घरफोटी झालेल्या इमारतीची पाहणी करताना पोलीस अधिकारी