सटाणा : येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील कोरोनाबाधित आढळलेल्या वैद्यकीय अधिकाºयाच्या घरातील नऊही जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्वच्या सर्व नमुने निगेटिव्ह आल्याने बागलाणकरांना दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील ताहाराबाद येथील निवासी व पंचायत समितीच्या आरोग्य विभागात कर्तव्यावर असलेल्या ३८ वर्षीय वैद्यकीय अधिकाºयास गेल्या रविवारी कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले होते.कोरोनाबाधित तिसरी व्यक्ती आढळल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. प्रशासनाने तत्काळ त्यांच्या संपर्कात आलेल्या १७ जणांचे विलगीकरण केले. त्यामध्ये त्यांच्या परिवारातील नऊ जणांना ताहाराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी विलगीकरण करण्यात आले आहे, तर उर्वरित पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील आठ जणांना येथील नामपूर रस्त्यावरील शासकीय वसतिगृहातील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले आहे.या १७ जणांच्या स्वॅबचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी (दि. १४) नऊ जणांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झालेअसून, परिवारातील सर्व कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्याचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी सांगितले.उर्वरित आठ जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी असून, शुक्रवार सकाळपर्यंत ते येणे अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले.--------------------------------------प्रतिबंधित क्षेत्र कायमसर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असले तरी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून सटाणा शहरासह ताहाराबाद गाव कायम राहणार आहे. या क्षेत्रात नियमांमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आली नसल्याचे तहसीलदार इंगळे पाटील यांनी स्पष्ट केले असून, जोपर्यंत बाधित रु ग्णाच्या दोन तपासण्या निगेटिव्ह येत नाहीत तोपर्यंत फक्त अत्यावश्यक सेवाच दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.