मालेगाव : गेल्या सोमवारपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या ३ दिवसात ७४ अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करुन ७ लाख ७९ हजार ७०८ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे.शहरातील अनधिकृत नळधारकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन माळवाड यांना दिले होते. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून कारवाई केली जात आहे. चारही प्रभागांमध्ये पथके नियुक्त करण्यात आली आहे. सोमवारी १४ नळजोडण्या अधिकृत करुन १ लाख ५ हजार ३२० रूपये तर मंगळवारी २१ नळजोडण्या अधिकृत करुन १ लाख ८४ हजार ७१३, बुधवारी २३ अनधिकृत नळजोडण्या अधिकृत करून १ लाख ८३ हजार ७६८ रूपये तर गुरूवारी ३९ नळजोडण्या अधिकृत करुन ३ लाख ५ हजार ९०७ रूपये वसूल करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून महापालिकेच्या उत्पन्न बुडत होते. नवनियुक्त आयुक्त बोर्डे यांनी अनधिकृत नळधारकांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. शहरात सुमारे दहा हजाराहून अधिक अनधिकृत नळजोडण्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भविष्यातील पाणीटंचाई व वाढती मागणी लक्षात घेवून महापालिकेने अनधिकृत नळधारकांविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे.
मनपाच्या तिजोरीत पावणेआठ लाखांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 12:57 AM
मालेगाव : गेल्या सोमवारपासून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळधारकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या ३ दिवसात ७४ अनधिकृत नळ जोडण्या अधिकृत करुन ७ लाख ७९ हजार ७०८ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. महापालिकेच्या उत्पन्नात भर पडली आहे.
ठळक मुद्दे महापालिकेने अनधिकृत नळधारकांविरुद्ध शोध मोहीम