नाशिक : विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येत असून, त्यासाठी मंत्रिमंडळातील नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची मंगळवारी प्रचंड धावपळ उडाली. उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांचे सकाळी नऊ वाजता आगमन होईल. त्यानंतर सव्वानऊ वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात नूतनीकृत नियोजन सभागृहाचे उद्घाटन होणार आहे. साडेनऊ वाजेपासून विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत या बैठका चालतील. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, वित्त राज्यमंत्री शंभुराजे देसाई हे बैठकीस उपस्थित राहतील.
उपमुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्री आज विभागीय बैठकीसाठी नाशकात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 1:19 AM
विभागातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (दि.१०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येत असून, त्यासाठी मंत्रिमंडळातील नऊ मंत्री उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणेची मंगळवारी प्रचंड धावपळ उडाली.
ठळक मुद्देप्रशासन यंत्रणेची धावपळ