उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाशिकला सकाळी नऊ वाजता मुंबईहून आगमन होईल. त्यानंतर सव्वानऊ वाजता नाशिक रोडच्या विभागीय आयुक्त कार्यालयात नूतनीकृत नियोजन सभागृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात येणार असून, साडेनऊ वाजेपासून विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेण्यात येणार आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत या बैठका चालतील. त्यानंतर दोन वाजता हेलिकॉप्टरने ते पुन्हा मुंबईकडे रवाना होतील. या बैठकीसाठी विभागातील सर्व मंत्री, पालकमंत्री निमंत्रित उपस्थित राहणार असल्याने त्यासाठी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषिमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, वित्त राज्यमंत्री शंभुराजे देसाई हे बैठकीस उपस्थित राहतील. यातील काही मंत्र्यांचे मंगळवारी रात्रीच शासकीय विश्रामगृहावर आगमन झाले आहे. दरम्यान, या मंत्र्यांचा राजशिष्टाचार, निवास, खाण्या-पिण्याची तसेच वाहनांची साेय करण्यात प्रशासन यंत्रणेची धावपळ उडाली आहे.
नाशकात आज उपमुख्यमंत्र्यांसह नऊ मंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:15 AM