नाशिक : झोळीत झोपलेली चिमुकली पडू नये या काळजीपोटी बांधलेल्या स्कार्पचाच फास लागून नऊ महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातपूरच्या शिवाजीनगरमध्ये सोमवारी (दि़२३) घडली़ आराध्या योगेश खाडपे असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातपूरच्या शिवाजीनगरमधील समर्थ रेसिडेन्सी अपार्टमेंटमध्ये योगेश खाडपे हे पत्नी व नऊ महिन्यांची मुलगी आराध्यासह राहतात़ सोमवारी (दि़२३) दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मनीषा खाडपे यांनी मुलगी आराध्या हीस घरातील झोळीमध्ये झोपण्यासाठी टाकले. मुलगी झोळीतून ती खाली पडू नये या काळजीने त्यांनी झोळीला स्कार्पने बांधला व त्यानंतर घरकामामध्ये व्यस्त झाल्या़ या दरम्यान, चिमुकली आराध्या ही झोळीतून सरकत-सरकत खाली असता, झोळीला बांधलेल्या स्कार्प तिच्या गळ्याभोवली अडकून तिला गळफास बसला़ ही बाब आई मनीषा खाडपे यांच्या लक्षात येईपर्यंत बराच उशीर झाला होता. योगेश खाडपे यांनी बेशुद्ध अवस्थेतील आराध्यास दुपारी ३ वाजेच्या सुमारास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पाटील यांनी फास बसून गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले़ याप्रकरणी गंगापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान, यापूर्वीही नाशिक शहरात चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चिमुकल्यांचे मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत़ लहान मुले खेळत असताना वा झोपलेले असताना घरातील सदस्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे़नाशिक शहरातील दुर्दैवी घटना१० आॅगस्ट २०१७सिडकोत आठ महिन्यांच्या वीर जयस्वाल या चिमुकल्याचा घशात फुगा अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली होती़३० जानेवारी २०१८अशोकामार्गावर बाल्कनीतून पडल्याने चार वर्षांच्या हसनेन मोईन सय्यद या एकुलता एक मुलाचा मृत्यू .५ फेब्रुवारी २०१८चांदगिरी येथील चार वर्षीय मुलगी शालिनी हांडगे हिने १० रूपयाचे नाणे गिळल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू .१६ फेब्रुवारी २०१८सिडकोत एक वर्षीय सुजय बिजुटकर याच्या घशात हरभऱ्याचा दाणा अडकल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना .
फास लागून नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 1:14 AM