नाशिक : आदिवासी भागातील नवजात बालकांना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरनंतर पेठ आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू केंद्र उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी नाशिक येथे केली. या विभागाचा लाभ परिसरातील आदिवासींनाही होणार असल्याचा विश्वास सावत यांनी व्यक्त केला आहे.नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये योग्य उपचारांअभावी गरोदर माता व नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये निदर्शनास होते येत होते. त्यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधित तालुक्यांमध्ये विविध अभियानांच्या माध्यमातून या स्थितीवर मात करण्यासाठी सातत्याने चांगले काम केले आहे. त्यामुळे जिल्ह्णात गेल्या वर्षभरात बालमृत्यूचे प्रमाण ५० टक्यांनी कमी झाले असून हे प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. सांवत यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याबाबत डॉ. सावंत यांनी चिंता व्यक्त केली. तसेच नागरिकांमध्ये साथीचे आजार होणार नाही, याबाबत जनजागृती करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. वेलनेस केंद्र स्थापणारराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रत्येक तालुक्यात वेलनेस केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या वेलनेस केंद्रांमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांना सहा महिन्यांचे प्रशिक्षण देऊन नंतर सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली.
पेठ, सुरगाण्याला प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 12:25 AM
नाशिक : आदिवासी भागातील नवजात बालकांना आधुनिक उपचार मिळावेत, यासाठी त्र्यंबकेश्वरनंतर पेठ आणि सुरगाणा तालुक्यात प्रत्येकी सहा खाटांचे एनआयसीयू केंद्र उभारण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी नाशिक येथे केली. या विभागाचा लाभ परिसरातील आदिवासींनाही होणार असल्याचा विश्वास सावत यांनी व्यक्त केला आहे.
ठळक मुद्देदीपक सावंत : बालमृत्यूमध्ये ५० टक्के घट