नाशिक : जिल्ह्यातील स्वाइन फ्लू रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात नऊ रुग्ण असून, त्यामध्ये सात महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे़ तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये पुरुष रुग्ण हा चांदवड तालुक्यातील तर महिला रुग्ण सिन्नर तालुक्यातील आहे़ दरम्यान सध्या उन्हाचा तडाखा वाढत असून यामुळे काही प्रमाणात या रोगाचा फै लाव होण्यास प्रतिबंध होईल, असा अंदाज वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे़स्वाइन फ्लूने जिल्ह्यातील पन्नासहून अधिक नागरिकांचा आतापर्यंत बळी घेतला असून, यामध्ये शहरापेक्षा ग्रामीण भागातील बळींची संख्या अधिक आहे़ जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात नऊ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या नऊ रुग्णांमध्ये सिन्नर तालुक्यातील दोन, दिंडोरी, कळवण, पेठ व चांदवड तालुक्यातील प्रत्येकी एक तर नाशिक तालुक्यातील तिघांचा समावेश आहे़दरम्यान, दोन पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून उर्वरित सात संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.स्वाईन फ्ल्यू बाबत जनजागृती केली जात असली तरी त्याबाबत नागरिकांकडून फारसी काळजी घेतली जात नसल्याचे दिसते. सार्वजनिक ठिकाणी खोकणे, नाका-तोंडाला रुमाल न लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. शाळेत जाणाºया लहान मुलांची अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे.
नऊ स्वाइन फ्लू संशयित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 12:03 AM