चिंताजनक : पालिकेच्या वरिष्ठ अधिकाºयाला लागण?; यंत्रणा कुचकामीनाशिक : स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या वाढतच असून, सप्टेंबर महिन्यातील बारा दिवसांत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच डेंग्यूच्याही संशयित रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. रुग्णालयात स्वाइन फ्लू सदृश रुग्णसंख्या वाढली असल्याचे चित्र आहे.राज्यात स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक बळी नाशिक जिल्ह्यात गेले आहेत. त्याची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे. मध्यंतरी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वाइन फ्लू व डेंग्यूच्या आजाराबाबत बैठक घेत त्याबाबतच्या उपाययोजनांचे आदेश महापालिकेसह जिल्हा प्रशासनाला दिले होते. परंतु, अद्याप उपाययोजनांबाबत सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. सप्टेंबर महिन्यात महापालिका हद्दीत ११ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्यातील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर मनपा हद्दीबाहेरील २० रुग्णांना लागण होऊन त्यातील सहा जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे बारा दिवसांतच स्वाइन फ्लूने नऊ जणांचा बळी घेतला आहे. बळींची संख्या वाढत असताना महापालिका व जिल्हा प्रशासन मात्र प्रबोधनावरच विसंबून असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या स्वाइन फ्लू कक्षाबाबत अद्यापही सदस्यांकडून तक्रारी सुरूच असून, त्यात सुधारणा झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे सांगितले जात असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या संख्येने शंभरी गाठली आहे. त्यात एका मुलीचा डेंग्यूने बळी घेतल्याची चर्चा आहे. मात्र, अद्याप त्याबाबतची नोंद महापालिकेकडे झालेली नाही.
स्वाइन फ्लूचे बारा दिवसांत नऊ बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:35 AM