नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.खोºयातील गावांना वरदान ठरणारी ही योजना गेल्या काही दिवसांपासून महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाणी पुरवठा ठप्प झाल्याने सर्वच गावांमध्ये सध्या पाणी टंचाई निर्माण झाली आहे. सध्या पावसाळा असूनही नायगाव खोºयातील महिलांवर हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.पाणी पुरवठा करणाºया उद्भव विहिरी शेजारून नदी दुथडी भरून वाहत असतांनाही या योजनेतून पाणी पुरवठा होत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.जायगाव, देशवंडी, वडझीरे, ब्राम्हणवाडे, मोहदरी आदी गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरत आहे. मात्र हीच नळपाणी पुरवठा योजना गेल्या दोन वर्षांपासून जलवाहिनी फुटण्याच्या कारणांमुळे वारंवार बंद पडत आहे. उद्भव विहिरीपासून मोहदरी येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतची तसेच मोहदरी येथुन नायगाव खोºयातील मुख्य जलवाहिनीची वारंवार दुरवस्था होत असल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.गेल्या दोन वर्षात या योजनेची मुख्य जलवाहिनी शेकडो वेळा फुटण्याचे प्रकार झाले आहे. वारंवार होणाºया दुरुस्तीचे बीलही काही हजारो रूपयांपर्यंत जाते. दोन वर्षातील एकंदरीत दुरूस्तीचे बील बघितले तर जवळपास या संपूर्ण योजनेच्या नवीन पाईप लाईनच्या बीलापर्यंत पोहचेल मग वारंवार दुरूस्ती पेक्षा नवीनच लोखंडी लाईन का टाकली जात नाही याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
नऊ गाव पाणी पुरवठा योजना कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 9:17 PM
नायगाव : सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरणाºया नायगावसह नऊ गाव पाणी पुरवठा योजना सध्या कुचकामी ठरत आहे. कृत्रिम पाणी टंचाईमुळे महिलांना पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे.
ठळक मुद्देनायगाव : पावसाळ्यात महिलांवर वणवण करण्याची वेळ