शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

मोसम खोऱ्यातील नऊ गावांचा संपर्कतुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 11:21 PM

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देबागलाणमध्ये संततधार : हरणबारी धरणातून विसर्ग; मोसम, हत्ती, कान्हेरी नदीला पूर

सटाणा : शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू असल्याने हरणबारी मध्यम प्रकल्पासह पठावे, दसाणे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नद्यांना पूर आला आहे. मोसम नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सुमारे एक हजार हेक्टरहून अधिक अर्ली द्राक्षबागा या संततधारेमुळे संकटात सापडून लाखो रु पयांचे नुकसान झाले आहे.शहरासह तालुक्यातील हरणबारी मध्यम प्रकल्प, दसाणे, पठावे लघुप्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात तसेच मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, भडाणे, जायखेडा, ब्राह्मणपाडे, आसखेडा, द्याने, मोसम खोरे, काटवन, आरम खोºयातील डांगसौंदाणे, कंधाण,े चौंधाणे तसेच पूर्व बागलाणमधील अजमीर सौंदाणे ,देवळाणे सुराणे वायगाव, वीरगाव, केरसाने परिसरात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. हरणबारी धरणातून ९२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे मोसम नदीला पूर आला आहे. सोमपूर, जायखेडा, आसखेडा, वाघळे, राजपूरपांडे गावांचा फरशीपूल पाण्याखाली गेल्याने वाघळे, राजपूरपांडे, मेंढीपाडे, वाडीपिसोळ, पिसोळ, नांदिन, तांदूळवाडी, भडाणे, पिंपळकोठे या गावांचा संपर्क तुटला आहे. दसाणे, पठावे लघुप्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने कान्हेरी व हत्ती नदीला पूर आला आहे. काही भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर केळझर मध्यम प्रकल्प ,जाखोड, दोधेश्वर, तळवाडे, बोढरी, बिलपुरी, शेमळी, रातीर ,कºहे येथील लघुप्रकल्प अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असून केळझर वगळता सर्वच प्रकल्प पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.त्यामुळे आरम, करंजाडी, दोध्याड, सुकेड या नद्या कोरड्याठाक आहेत. मुल्हेर-अंतापूर रस्त्यावरील पुलाचे बांधकाम ढासळल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.या संततधार पावसामुळे द्राक्षासह टमाटा, मका, मिरची ,कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यात एक हजार हेक्टरहून अधिक द्राक्षबागांची अर्ली छाटणी झाली आहे. बागा फुलोºयावर असून, कुज, डावनी, पूलगळ सारखे प्रादुर्भाव निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होण्याबरोबरच हंगाम हाताशी येईल की नाही या चिंतेने शेतकर्यांना ग्रासले आहे. अन्य पिकांवरही अळीचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झाले आहे.