शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
5
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
7
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
8
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
9
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
10
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
12
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
13
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
14
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
15
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
16
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
18
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
19
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
20
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट

नऊ गावे तहानलेली; १५ गावांना टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 9:02 PM

 येवला : सातत्याने दुष्काळी असणाऱ्या येवला तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. नाही म्हणायला गेल्या दहा वर्षात काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागत असले तरीही तालुका अजूनही टँकरमुक्त झालेला नाही.

योगेंद्र वाघ ( येवला तालुका) सातत्याने दुष्काळी असणाऱ्या येवला तालुक्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. नाही म्हणायला गेल्या दहा वर्षात काही प्रमाणात प्रश्न मार्गी लागत असले तरीही तालुका अजूनही टँकरमुक्त झालेला नाही. सद्यस्थितीला तालुक्यात १५ गावे तीन वाड्यांना टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, नऊ गाव-वस्त्यांचे पाणी मागणी प्रस्ताव पंचायत समितीत दाखल झाले आहेत. जूनअखेर २६ गाव ३९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे यंत्रणेकडे नियोजन आहे. दरम्यान, येवला शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४३३.५० मि.मी. असून तालुक्यात मागील वर्षी ७०९.४ मि.मी. पाऊस झाला आहे. साधारणत: मार्चपासूनच तालुक्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होतो, मात्र यंदा बºयापैकी पाऊस झालेला असल्यान दीड महिना उशिरा तालुक्यात टँकर सुरू झाले आहेत. गेल्या काही वर्षात बंधारा खोलीकरणाची व जलसंधारणाची कामे तालुक्यात झाल्याने त्याचा फायदाही यंदा दिसून येत आहे.पालखेडा डावा कालवा पाणी आवर्तनावर येवला शहरासह ३८ गाव पाणी योजना अवलंबून आहे. पाणी आवर्तन लांबले की शहरासह योजनेतील गावांनाही पाणीटंचाईचा फटका बसतो. उन्हाचा तडाखा वाढू लागला की, तालुक्यातील पाणी मागणाºया गावांच्या संख्येत वाढ होते, पाणी मागणाºया गावांना टँकरद्वारे पाणी पुरवणे हा एकमेव कार्यक्रम येथील शासकीय यंत्रणा राबवते. दरवर्षी टँकरवर शासनाचे लाखो रुपये खर्च होतात आणि यातच शासकीय यंत्रणा धन्यता मानते. नाही म्हणायला विंधनविहिरी घेणे-दुरुस्ती करणे, बुडक्या घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विहीर खोल करणे आदी नेहमीचेच उपाय दरवर्षीच केले जातात.तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील टँकरग्रस्त ३८ गावांसाठी नळ पाणीपुरवठा योजना राबविली गेली. आज, या योजनेच्या माध्यमातून ५२ गावे खरोखर टँकरमुक्त झाली आहेत. विशेष म्हणजे नफ्यात चालणारी देशातील एकमेव पाणी योजना असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याच धर्तीवर भिंगारेसह परिसरातील काही गावांसाठीही नांदूरमधमेश्वर येथून नळ पाणी योजना देखील प्रस्तावित आहे. तालुक्यातील पूर्व भागातील टँकरग्रस्त ४३ गावांसाठी पाणीपुरवठा योजना आता आकार घेऊ लागली आहे.योजनेसंदर्भात गेल्या आर्थिक वर्षात सर्वेक्षणाची निविदा निघाली होती आणि सर्वेक्षणाचे कामही पूर्ण झाले आहे. तर जमीन अधिग्रहीत करण्याच्या प्रक्रिया सुरू असल्याचे कळते. राजापूर जिल्हा परिषद गटाचे तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण गायकवाड यांनी या योजनेसाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या योजना पूर्णत्वास आल्या तर तालुका टँकरमुक्त होईल, असे सांगितले जाते. पण योजनापूर्ततेसाठी अजून किती वर्षे जातात हे आताच सांगता येणार नाही.-------------------------------नळपाणी योजनेने ५२ गाव टॅँकरमुक्तयेवला तालुक्यातील धानोरे, धुळगाव, पिंपळगाव लेप, शिरसगाव लौकी, एरंडगाव बु॥, एरंडगाव खु॥, जळगाव नेऊर, नेवरगाव, मानोरी, देशमाने, बाभुळगाव बु॥, बाभुळगाव खु॥, अंगणगाव, साताळी, निमगाव मढ, कुसूर, अनकुटे, धामोडे, सावरगाव, विसापूर, विखरणी, कातरणी, सोमठाणदेश, अंदरसूल, गवंडगाव, उंदीरवाडी, आडगाव चोथवा, पिंपळगाव जलाल, नांदेसर, नगरसूल, सायगाव, भारम, न्याहारखेडा बु॥, न्याहारखेडा खु॥, पिंपळखुटे बु॥, पिंपळखुटे खु॥, सुरेगाव रस्ता, भायखेडा ही ३८ गावे दरवर्षी उन्हाळ्यात टंचाईग्रस्त, टँकरग्रस्त ठरत. टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर दरवर्षी होणारा लाखोंचा खर्च वाचवण्यासाठी व ही गावे टँकरमुक्त करण्यासाठी येवला तालुक्यात ३८ गाव नळ पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली. या योजनेतील समाविष्ट ३८ गाव टँकरमुक्त झाल्याने या गाव परिसरातील इतर गावेही पाणी योजनेत समाविष्ट करण्याची मागणी करू लागली. टप्प्याटप्प्याने या योजनेत अंतरवेली, सातारे, चिचोंडी खुर्द, चिचोंडी बुद्रुक, तळवाडे, बाळापूर, आंबेवाडी, आडगाव रेपाळ, मुरमी, निळखेडे, गुजरखेडे, गोपाळवाडी, साबरवाडी (देवरगाव), अंगुलगाव ही नव्याने १४ गाव समाविष्ट केल्या गेली. या योजनेमुळे आता तालुक्यातील ५२ गाव टँकरमुक्त झाली आहेत.---------------------------------वन्य-जीवांचाही पाणीप्रश्न ऐरणीवरयेवला तालुक्यातील राजापूर, ममदापूर, अनकाई परिसरातील वनक्षेत्रात हरण, काळवीट, माकड आदींसह वन्यजीव आहेत. वनक्षेत्रातील जलस्रोत कोरडेठाक पडल्याने अन्न-पाण्याच्या शोधात वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यातून घडणाºया अपघात वन्यजीव जखमी होतात तर काहींचा बळीही जातो, हे दरवर्षीचे आहे. वाढत्या उन्हाबरोबरच वन्यजीवांसाठी वनविभाग अन्न-पाणी उपलब्ध करून देते. मात्र, वन्यजीवांचे अपघात वा बळी थांबलेले नाही. वन्यजीवांसाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याचे मत वन्यजीवप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.--------------------------साठवण तलावात मर्यादित पाणीसाठापालखेड डावा कालवा आवर्तनावर येवला शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पालखेडच्या आवर्तनाने शहराला पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव भरला जातो व या तलावातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, ऐन उन्हाळ्यात पाणी आवर्तन लांबते व शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.शहरास पाणीपुरवठा करणाºया साठवण तलावात सध्या मर्यादित पाणीसाठा शिल्लक आहे. आहे त्या पाण्याचे नियोजन करत पालिकेच्या वतीने शहराला चार दिवसाआड एकदा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पालखेड कालवा आवर्तनास विलंब असल्याने, शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.-----------------------शासकीय टॅँकरद्वारे पाणीपुरवठायेवला तालुक्यातील टंचाईग्रस्त १५ गाव ३ वाड्यांना नऊ शासकीय टँकरद्वारे सद्यस्थितीत पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील आहेरवाडी, हडपसावरगाव, खरवंडी, चांदगाव, आडसुरेगाव, ममदापूर, लहित जायदरे, तळवाडे (शिवाजीनगर), ममदापूर तांडा, सायगाव (महादेववाडी), सोमठाणदेश, रेंडाळे, कोळम बु॥, कुसमाडी, पांजरवाडी, कासारखेडे, भुलेगाव या १५ गाव व तीन वाड्यांना नऊ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर तालुक्यातील खैरगव्हाण, गोपाळवाडी (खैरगव्हाण), तांदूळवाडी, अनकाई, वसंतनगर, कोळगाव, वाईबोथी, सावरगाव (संभाजीनगर), नगरसूल या नऊ गाव- वाड्यावस्त्यांचे टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल आहेत.

 

 

टॅग्स :Nashikनाशिक