सिडको : वेळ दुपारी दोन वाजेची... सिडको परिसरातील रहिवासी असलेल्या नऊ वर्षांच्या दोघी जुळ्या बहिणी नेहमीप्रमाणे खासगी शिकवणीसाठी घराबाहेर पडल्या... शिकवणीला दांडी मारत परिसरातील मंदिरातच रमल्या... शिकवणीला गेलो नाही म्हणून आई मारणार या भीतीने दोघींनी अपहरणाचा बनाव केला....मात्र अंबड पोलीस ठाण्याची यंत्रणा जागची हलली...अन् सुरू झाले त्या चिमुरडींचे सर्च मिशन...दोन्ही बालिका घराबाहेर शिकवणीसाठी पडल्या. दरम्यान, त्यांनी शिकवणीला जाणे टाळले आणि पवननगर विठ्ठल मंदिरात खेळताना त्या रमल्या. मंदिरात बराच वेळ खेळल्यानंतर दोघींनाही शिकवणीची आणि घरी जाण्याची आठवण झाली. दरम्यान, दोघींची पावले घराकडे वळाली. ‘आपण शिकवणीला गेलो नाही, हे आईला समजले तर ती आपल्याला मारेल’ या भीतीने त्यांनी मग रचला अपहरणाचा डाव. त्यांनी आईला अपहरण झाल्याचे घरी येऊन सांगितले. आई-वडिलांनी तत्काळ अंबड पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी तत्काळ सूत्रे हलविली.आई-वडिलांसह पोलिसांना त्या मुलींना एक अनोळखी घर दाखवून या घरातच आम्हाला कोंडून ठेवले होते, असे सांगितले. यावेळी पोलिसांच्या पथकाने तत्क ाळ संशयित घराजवळ जाऊन पाहणी केली असता मुली खोट्या बोलत असून, ते बनाव करीत असल्याचे लक्षात आले. त्यांनी दोघी मुलींना वाहनातून आई-वडिलांसोबत पोलीस ठाण्यात आणले. यावेळी कड यांनी प्रेमाने त्यांच्याशी स्वतंत्र संवाद साधला असता शिकवणीला दांडी मारली त्यामुळे आई मारेल, या भीतीने अशा पद्धतीचा खोटा बनाव केल्याचे सांगितले.
नऊ वर्षांच्या बहिणींनी केला अपघाताचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:54 AM