शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्यात येत असून, छोटे-मोठे व्यावसायिकदेखील सॅनिटायझर, मास्क यांचा वापर करून प्रतिबंधात्मक खबरदारी घेत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर सध्या राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये नववी, दहावी व बारावीसाठी १ जुलैपासून आॅनलाइन शिक्षण सुरू करण्याची तयारी सुरू आहे.नाशिकमधील एचपीटी, आरवायके, बीवायकेसारख्या महाविद्यालयांमध्ये १२ वीसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली असून, १ जुलैपासून नियमितपणे आॅनलाइन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे विविध शिक्षण सस्थांकडून नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीही आॅनलाइन शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.कोरोनामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासह कोणत्याही शैक्षणिक कामासाठी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिकमधील विविध महाविद्यालयांनी बारावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली असून, जवळपास ७० ते ८० टक्के प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ही प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय प्रशासनांकडून सांगण्यात येत आहे.मात्र याविषयी शिक्षण विभागाकडे संकलित स्वरूपाची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्यानेच समोर आले आहे. त्यामुळे याबाबत विद्यार्थी आणि पालकांकडून यासंबंधीची विचारणा होत आहे. मात्र काही वेळा समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे समजते. जुलैपासून शक्य त्या ठिकाणी शाळा सुरू करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. हे आदेश तसेच्या तसे पुढे पाठविण्यापलीकडे शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. शहरासह जिल्ह्यातील किती महाविद्यालयांध्ये बारावीसाठी आॅनलाइन अथवा आॅफलाइन प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली, किती शाळांमध्ये आॅनलाइन शिक्षणाची तयारी करण्यात आली आणि किती विद्यार्थी प्रत्यक्ष आॅनलाइन शिक्षणप्रक्रियेत सहभागी होणार आहेत.याविषयी माध्यमिक शिक्षण विभाग अनभिज्ञ असल्याने स्थानिक शिक्षण विभाग व शिक्षणाधिकारी शासनाकडून येणारे आदेश पुढे पाठविणारे टपालखाते बनले आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ४० टक्के अभ्यासक्रम आॅनलाइनगोखले एज्युकेशन संस्थेच्या शहरी भागांतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीच्या प्रवेशप्रक्रिया दि. १० ते ३० जून २०२० या कालावधीत राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.१ जुलैपासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सूचनांप्रमाणे आॅनलाइन शिक्षण सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ४० टक्के अभ्यासक्रम आॅनलाइन पद्धतीने शिकविण्याची पूर्वतयारी संस्थेने केली असल्याची माहिती संस्थेच्या मानव संसाधन संचालक प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे यांनी दिली.