सिन्नर : तालुक्यातील वडगावपिंगळा येथील ७६ वर्षीय वृध्दाचा देवळाली कॅम्प येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना मृत्यू झाला. उच्च रक्तदाब असलेल्या सदर वृध्दाला कोरोनाची लागण झाली होती. तीन आठवडे त्यांनी कोरोनासोबत झुंज दिली मात्र शनिवारी (दि.१८) पहाटे त्यांचे निधन झाले. तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ झाली आहे.शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानंतर रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून आले. कानडी मळा येथे १८ व २२ वर्षीय युवक, वृंदावननगर येथील ३६ व ४७ व्यक्ती, खळवाडी येथील २१ वर्षीय युवक, एम जी नगर येथील ४३ वर्षीय पुरुष, गणेशपेठेतील ४७ वर्षीय यांच्याबरोबर वावी येथील ६० वर्षीय पुरुष व कृष्णनगर (डुबेरे) येथील २१ वर्षीय युवक कोरोनाबाधित असल्याचे अहवालात दिसून आले. यातील पाच कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल खासगी प्रयोगशाळेतून प्राप्त झाले असल्याचे माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. तालुक्यातील २४८ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्जार्च देण्यात आले असून उर्वरित रुग्णांवर सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडियाबुल्स येथे उभारण्यात आलेल्या कोवीड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काही रुग्णांना नाशिक येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.---------------------शहरातील युवकाचा मृत्यूशहरातील ३१ वर्षीय कोरोनाबाधित युवकाचा मृत्यू झाला आहे. सदर युवक ठाणे येथे राहणारा असल्याने व उपचारासाठी अगोदर सिन्नर व नंतर नाशिकला दाखल करण्यात आला होता. मात्र सध्या तो ठाणे येथील रहिवासी असल्याने त्याचा मृत्यू सिन्नरला गणला जाणार नसून तो ठाणे येथे मोजला जाईल असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले.
सिन्नर तालुक्यात कोरोनाचा नववा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 8:31 PM