लासलगाव : लोकन्यायालय हे आपले प्रलंबित दावे व खटले तडजोड होऊन मिटविण्यासाठी महत्वाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.वाघमारे यांनी राष्ट्रीय लोकन्यायालय प्रसंगी बोलताना केले. लोकन्यायालयात दिवसभरात २६२ प्रकरणे निकाली निघाली तर ६१ लाख ४१ हजार रूपयांची वसुली व तडजोड झाली.निफाड येथील राष्ट्रीय लोकन्यायालयप्रसंगी वरीष्ठ स्तर न्यायाधीश एस.बी.काळे व निफाडच्या प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एम.एस.कोचर तसेच निफाड वकील संघाचे अध्यक्ष अॅड जी एन शिंदे, निफाड वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड बाळासाहेब जंगम यांचेसह विविध बॅँकांचे शाखा व्यवस्थापक, विजवितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी एस.बी.दरेकर, सौ.विजया जगताप, अरविंद बडवर, ए.वाय.शेख, श्रीमती अफरोज शेख, एन.सी केदार , आर.बी.गायकवाड या वकीलांनी काम पाहिले. यावेळी २४२९ पैकी १६७ प्रकरणात तडजोड होऊन १९ लाख ३० हजार ४४३ रूपये वसुली झाली. तर न्यायालयातील प्रलंबीत ३४८ दिवाणी दावे तसेच दरखास्ती व फौजदारी प्रकरणे व केसेस ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी ९५ प्रकरणात तडजोड होऊन ४२ लाख ११ हजार ३४२ रूपये वसुल झाले.
निफाड लोकन्यायालयात २६२ प्रकारणे निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2018 5:18 PM
एकूण २४२९ दावे : ६१ लाखांची वसुली
ठळक मुद्देलोकन्यायालय हे आपले प्रलंबित दावे व खटले तडजोड होऊन मिटविण्यासाठी महत्वाचे माध्यम