सायखेडा : ढगाळ हवामानामुळे काही दिवस गायब झालेल्या थंडीने पुन्हा एकदा जोर धरला असून निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील थंडीने यंदाची सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून शुक्र वारी रात्री ८.५ अंश इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादकांना हुडहुडी भरली असून पिकांच्या वाढीवर परिणाम जाणवू लागला आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. मागील वर्षी राज्यातील सर्वाधिक कमी म्हणजेच ० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यंदा मात्र काही दिवसांपूर्वी थंडीने जोर धरला होता मात्र हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरणामुळे थँडी कमी झाली होती, दहा अंशावर आलेले तापमान २० अंशावर जाऊन पोहचले होते मात्र गुरु वार पासून पुन्हा एकदा वातावरण निवळले. ढगाळ हवामान गेले आणि थँडीने पुन्हा एकदा जोर धरला शुक्र वारी रात्री अचानक थंडी वाढली शनिवारी सकाळी हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला होता, गार वारा आण िथंड हवा यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. सकाळी शेतात जाऊन काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी थंडीमुळे घरात रहाणे पसंत केले तर शनिवारी सर्वच शाळा सकाळच्या सत्रात असतात मुलांना झोपेतून उठून शाळेत येण्यासाठी घराबाहेर पडावे लागते अशा वेळी अनेक मुले झोपेत राहिले तर अनेकांना शाळेत कुडकुडत यावे लागले. शाळेच्या दैनंदिन उपस्थितीवर थंडीचा परिणाम दिसून आला. वाढती थंडी अनेक पिकांना लाभदायक असली तरी द्राक्षासारख्या नगदी आणि महत्वपूर्ण पिकाला सर्वाधिक फटका थँडीचा बसतो मण्याच्या फुगवणीवर परिणाम होतो तर भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असतोअगोदर अवकाळी पाऊस आत्ता थँडीचा सामना करत शेतकरी द्राक्ष पीक वाचवत असले तरी वाढता खर्च आण िवाढती थँडी शेतकर्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे . पीक वाचविण्याचा शेतकºयांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहे. थंडी अशीच वाढत राहिली तर त्याचा परिणाम अनेक पिकांवर आण िदैनंदिन जीवनावर होत राहील.
निफाडचा पारा ८.५ अंशांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:58 PM