लासलगाव : बोचरी थंडीसआणि भल्या पहाटे धुक्याची चादर अशी अवस्था गेल्या दोन दिवसांपासून असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागाची फळे वाचवण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत. थंडीत शेकोट्या पेटविणारी मंडळी गावोगावी दिसत आहे.निफाड तालुक्यात ढगाळ हवामानाने कमी झालेली थंडी पुन्हा जोर धरत आहे निफाडचा पारा रविवारी (दि.८) सकाळी कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रात पारा १३.२ अंशावर घसरल्याची नोंद झाली. गत आठवड्याड्यात पारा घसरत असतांना बेमोसमी हवामानाने थंडी गायब झाली होती. मात्र आता दोन दिवसांपासुन निफाड परिसरात थंडीत वाढ झाली आहे. निफाडकरांसाठी गुलाबी थंडीचा महिना सुरु झाला. रब्बीच्या गहु, हरभरा, कांदा पिकांसाठी घसरता पारा फायदेशीर आहे. मात्र द्राक्षबागांना अडचणीचा ठरत आहे.निफाड तालुक्यात सकाळपासुन गार हवा सुटली असल्याने शेकोट्यांचा आधार नागरिक घेत आहेत.
निफाडचा पारा १३.२ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 4:58 PM
लासलगाव : बोचरी थंडीसआणि भल्या पहाटे धुक्याची चादर अशी अवस्था गेल्या दोन दिवसांपासून असल्याने निफाड तालुक्यातील द्राक्षबागाची फळे वाचवण्यासाठी शेकोट्या पेटल्या आहेत. थंडीत शेकोट्या पेटविणारी मंडळी गावोगावी दिसत आहे.
ठळक मुद्दे थंडीत शेकोट्या पेटविणारी मंडळी गावोगावी दिसत आहे.