निफाड : निफाड तालुका विधी व न्याय सेवा समिती व निफाड वकीलसंघ यांच्या वतीने गुरु वारी निफाड शहरातून सविधान जनजागृती रॅली काढण्यात आली होती.वैनतेय विद्यालयापासून या रॅलीला प्रारंभ झाला या रॅलीत वैनतेय विद्यालयाचे विद्यार्थी सामील झाले होते ही रॅली शिवाजी चौक, शनी मंदिर, माणकेश्वर चौक, पेठ गल्लीमार्गे काढण्यात आली या रॅलीत वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य रविकांत कर्वे, पर्यवेक्षक एस. एम. सोनवणे, पर्यवेक्षक संतोष गोरवे, रमेश सानप, जी. एस. पवार, भूषण सोनवणे, गणेश कुयटे, श्रीमती आर. एस. गायकवाड, श्रीमती ए. डी. ढोमस, अफरोज शेख, बी. टी. चोरिडया, एम. एस. निर्मल, आदिबा शेख, तालुका विधी व न्याय सेवा समितीचे समन्वयक वाय. पी. मवाळ आदी मान्यवर सामील झाले होते. विधी सहायता अंतर्गत कैद्यांचे हक्क, विधी सहायता अंतर्गत बेटी बढाव, बेटी बचाव, विधी सहायता अंतर्गत माध्यस्तता केंद्र, विधी सहायता अंतर्गत विधी सेवा सहायता केंद्र आदी वाक्य लिहिलेली बॅनर या रॅलीत होती.
निफाडला संविधान जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 9:40 PM