निफाड : गेल्या १५ ते २० दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर शुक्र वारी निफाड व परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुपारी मुसळधार पावसाने निफाड व परिसरातील गावांना झोडपून काढले होते. त्यानंतर गुरु वारी रात्रीही मुसळधार पावसाने याच परिसराला झोडपून काढले शुक्र वारी दि २४ रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान पावसाने झोडपण्यास सुरु वात केली. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले होते मका , सोयाबीनच्या पेरणीनंतर पावसाने १५ ते २० दिवस विश्रांती घेतल्याने शेतकर्यांत चिंतेचे वातावरण पसरले होते मात्र या पावसाने हजेरी लावल्याने मका , सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे गेल्या सात ते आठ दिवसापासून सूर्यनारायण आग ओकत असल्याने नागरिक प्रचंड उष्म्याने हैराण झाले होते मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
निफाडला शेतकऱ्यांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 8:59 PM