शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

निफाड : नगराध्यपदी शिवसेनेचे होळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 12:03 AM

निफाड : निफाडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मुकुंद नानासाहेब होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. निफाड नगरपंचायतीवर भाजपा-सेना युतीची सत्ता आहे.

निफाड : निफाडच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे मुकुंद नानासाहेब होळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. निफाड नगरपंचायतीवर भाजपा-सेना युतीची सत्ता आहे. सकाळी १० वाजता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार विनोद भामरे यांनी, तर सहायक म्हणून निफाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी काम पाहिले. मुकुंद होळकर यांनी नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज भरले होते. पहिल्या अर्जावर सूचक म्हणून राजाभाऊ शेलार, तर अनुमोदक म्हणून आनंद बिवलकर यांचे नाव होते. दुसºया अर्जावर सूचक म्हणून सुनीता कुंदे यांचे, तर अनुमोदक म्हणून एकनाथ तळवाडे यांचे नाव होते. मुकुंद होळकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी भामरे यांनी निफाडच्या नगराध्यक्षपदी मुकुंद होळकर यांची निवड झाल्याचे घोषित केले. निवडप्रक्रि येप्रसंगी उपनगराध्यक्ष चारुशीला कर्डिले, नगरसेवक आनंद बिवलकर, अनिल कुंदे, सुनीता कुंदे, स्वाती गाजरे, नयना निकाळे, एकनाथ तळवाडे, जावेद शेख, लक्ष्मीबाई पवार, अलका पवार, मंगल वाघ, नूरजहा पठाण, देवदत्त कापस आदी नगरसेवक सहभागी झाले होते. निवडप्रक्रिया पार पडल्यानंतर नगरपंचायतीच्या सभागृहात होळकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, निफाड नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक दिलीप कापसे, संदीप जेऊघाले, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, सोमनाथ पानगव्हाणे, शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम गडाख, उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, इरफान सय्यद, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वाबळे, शंकर वाघ, वैकुंठ पाटील, संजय कुंदे, रमेश जेऊघाले, विलास मत्सागर, लक्ष्मण निकम, आसिफ पठाण, प्रभाकर मापारी आदींसह शिवसेना, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.