निफाड : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पी. टी. विद्यालय खेडलेझुंगे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १७ व १८ सप्टेंबर रोजी चौदा वर्षाआतील निफाड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. मुलांचा अंतिम सामना म्हाळसाकोरे येथील आरुढ विद्यालय विरुध्द शिंगवेचे गोदावरी विद्यालय यांच्यात झाला. यात शिंगवे विद्यालयाने प्रथम क्र मांक पटकावला.मुलींचा अंतिम सामना नांदुर्डी येथील जनता विद्यालय विरुध्द म्हाळसाकोरेचे आरुढ विद्यालय यांच्यात होऊन म्हाळसाकोरे विद्यालयाने प्रथम क्र मांक मिळवला. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभप्रसंगी अध्यक्षस्थानी भगीरथ घोटेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती उपसभापती गुरु देव कांदे, विस्ताराधिकारी एस.डी. थोरात, केंद्रप्रमुखजनार्दन पगारे, आनंदराव घोटेकर, सोमनाथ घोटेकर, माजी मुख्याध्यापक खैरनार , प्रभारी मुख्याध्यापक डी.बी. कडवे, पंकज शिंदे, किरण पवार आदी मान्यवर उपस्थित होते. खेळाडू बलवान असतील तरच देश बलवान होऊ शकतो, असे प्रतिपादन गुरु देव कांदे यांनी केले. स्पर्धेत मुलांचे २७ व मुलींचे १४ संघ सहभागी झाले होते. विजेत्या संघास किरण पवार यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. विद्यालयातील सर्व सेवकांनी दोन्ही संघांना ११११ रुपयांचे रोख पारितोषिके दिलीे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. एम, पवार व अच्युतम घोटेकर यांनी केले. आभार जी. एम. वायकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्र ीडाशिक्षक विलास निर्भवणे, यु.के पवार, डी. बी. खडताळे, एस.डी सानप, श्रीमती बी. सी पगारे यांनी परीश्रम घेतले.
निफाड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 1:17 AM