शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

निफाडला भोंदूबाबासह तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:52 AM

निफाड : नाशिकच्या महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत सदर महिलेने शारीरिक संबंध करावे यासाठी अघोरी पूजेसाठी उपाय सांगणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अटक केली असून, त्यांना निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.

ठळक मुद्देपैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष : पीडित महिलेची तक्रार

निफाड : नाशिकच्या महिलेला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत सदर महिलेने शारीरिक संबंध करावे यासाठी अघोरी पूजेसाठी उपाय सांगणाऱ्या भोंदूबाबा व त्याच्या दोघा साथीदारांना निफाड पोलिसांनी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अटक केली असून, त्यांना निफाड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे.याबाबतची माहिती अशी की, प्रसाद उत्तमराव जाधव याच्याशी ओळख झालेल्या या महिलेला दि. १० जानेवारी रोजी निफाड येथे एक बाबा असून, तो पैशांचा पाऊस पाडतो, त्याला पूजेसाठी एका मुलीची गरज आहे, तुम्ही काम कराल काय, अशी विचारणा केली व त्यांचा फोटो काढून बाबाला मोबाइलवर पाठविला आणि प्रत्यक्ष भेट घेण्याचे ठरले. सदर महिलेने हिंमत केली आणि घटनेला सामोरी गेली. प्रसाद जाधव याने महिलेची आणि संशयित भोंदूबाबा योगेश वाळीबा नागरे (रा. शिवरे, ता. निफाड) याची निफाड येथे १२ जानेवारी रोजी शिवपार्वती लॉन्स येथे भेट घडवून आणली. या भेटीत बाबाने पैशांचा पाऊस पाडण्यासाठी महिलेला शुद्धीकरण विधी व पूजा करावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी १३ जानेवारीला निफाडला बोलावले. ही बाब महिलेने आपल्या साथीदारांना सांगितली आणि या सर्वांनी या घटनेचा पर्दाफाश करण्याचे ठरविले. त्यानंतर पीडित महिला, प्रसाद जाधव आणि योगेश सोनार यांच्यासह नाशिक येथून निफाड येथे आले. बाबाच्या अल्टो गाडीमध्ये पीडित महिला व सदर बाबा बसले असता भोंदूबाबा नागरेने महिलेला शुद्धीकरणासाठी आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे सांगितले. त्याचबरोबर महिलेला उत्तेजक द्रव्याच्या २ गोळ्या व एक पावडरची पुडी दिली. दरम्यान बाबा आपल्यासोबत काहीतरी वाईट करणार हे लक्षात आल्याने महिलेने तुषार गवळी यांना एसएमएस केला. सदर सहकाºयांनी निफाड पोलीस स्टेशनला ताबडतोब फोनद्वारे कळवले. निफाड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भोंदूबाबासह तिघांना ताब्यात घेतले. योगेश वाळीबा नागरे (शिवरे, ता. निफाड ) योगेश आत्माराम सोनार (पवननगर, सिडका,े नाशिक) प्रसाद उत्तमराव जाधव (टाकळी विंचूर, ता. निफाड ) या तिन्ही संशियतांवर महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष अनिष्ट व जादुटोणा प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निफाडचे पोलिस उपअधीक्षक माधव पिडले, पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सातव तपास करत आहेत.छत्रपती सेनेची महत्त्वपूर्ण भूमिकाफिर्यादी महिलेने या प्रकरणी संशय आल्यानंतर सतर्कता दाखवत भंडाफोड करण्यासाठी प्रयत्न केला. सदर महिलेने पैशाचा पाऊस पाडण्याचा प्रकार आणि पूजेसाठी बाबाने शरीरसुखाची मागणी घातल्याची बाब आपल्या साथीदारांना सांगितली आणि या प्रकाराचा पर्दाफाश करण्याची योजना आखली. यामध्ये नाशिकचे अंधश्रद्धा विरोधात काम करणारे आणि छत्रपती सेनेचे अध्यक्ष तुषार गवळी, तानाजी शेलार, नीलेश शेलार, धीरज खोळंबे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. पीडित महिलेने निफाड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.