निफाड : ग्रामीण भागात शहरी सुविधांची तरतुदीअंतर्गत (पुरा) या योजनेसाठी केंद्र शासनाने प्रस्ताव मागितले होते यात प्रत्येक जिल्ह्यातून १ प्रस्ताव यावा असे निर्देश होते मात्र महाराष्ट्रातून केवळ एकच प्रस्ताव आणि तोही नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील १४ गावांसाठीचा केंद्राला सादर करण्यात आला असून, ग्रामविकासमंत्री नितीन गडकरी यांनी प्रस्तावाला सकारात्मकता दर्शविली आहे.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजाभाऊ शेलार यांनी पुढाकार घेत हा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच केंद्राच्या ग्रामविकास मंत्रालयात पाठविला असून, त्याला प्राथमिक मंजुरीही मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी ग्रामीण भागातील नागरिकांचे शहरीकरण होत असून, यावर मार्ग काढण्यासाठी ग्रामिण भागातील जनतेला शहरी सुविधा देण्यासाठी योजना व संकल्पना मांडली तीच ही योेजना असून, केंद्राच्या ग्रामविकास मंत्रालयाने त्यासाठी १२० कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे.भागात बिबट्याची दहशत ४/५ वर्षापासून वाढली आहे बऱ्याचदा या भागात विजेची समस्या निर्माण होते त्यामुळे या भागाचा निफाड शहराशी संपर्क जलद व्हावा यासाठी १५ ते २० किमीचे चांगले पक्के रस्ते, सोलर लँप, तसेच गोदावरी बॅक वॉटर व प्रदूषणामुळे पाणी प्रदूषित होऊन आजाराचे प्रमाण वाढते म्हणून या सर्व गावांना जलशुद्धीकरण प्रकल्प, या गावातील शेती पूरक व्यवसाय, शेतीसाठी खत प्रकल्प, लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन, कादवा नदीवर साठवण बंधारे, शिवार रस्त्यांची जोडणी, नदीचे घाट बांधणे, सार्वजनिक शौचालये, वृक्षारोपण, भूमिगत गटारी, साईभक्तांसाठी निवाराशेड, गावांमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, वाचनालये, कचरा गोळा करण्यासाठी गाड्या, अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा, अभ्यासिका, दलित वस्तींमध्ये सभागृहे, बचत गटांना यंत्रसामग्री खरेदीसाठी आर्थिक मदत आदि प्रकारची पायाभूत सुविधा असलेली कामे सुचविण्यात आली आहे. प्रत्येक गावांसाठी गरज पाहून सुचविले आहे. (वार्ताहर)
निफाडला १२० कोटींचा निधी?
By admin | Published: October 19, 2014 12:12 AM