निफाड : निफाड नगरपंचायत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी २८ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता निवडणुकीत १७ प्रभागांतून ६८ उमेदवार रिगणात आहेत. प्रभाग १७ मधून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवारांचा अर्ज जिल्हा न्यायालयाने अवैध ठरविल्याने उमेदावाराने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाच्या निकालानंतर उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. अर्ज माघारीनंतर प्रभागनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे अंतिम चित्र स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्र.१- भारती कापसे (शिवसेना), संगीता कापसे ( राष्ट्रवादी कॉँग्रेस), नूरजहॉ अमनखॉ पठाण (बसपा), प्रभाग क्र.२- विमल जाधव (राष्ट्रवादी कॉँग्रेस), लक्ष्मी पवार (शिवसेना), अश्विनी भगरे (अपक्ष), प्रभाग क्र.३-नवनाथ पवार (भाजपा), शोभा माळी (राष्ट्रवादी कॉँग्रेस), प्रभाग क्र.४-गणेश कुंदे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), श्याम गोळे (अपक्ष), जावेद हसन शेख (शिवसेना), उत्तम शेलार (कॉँग्रेस), प्रभाग क्र.५- अशोक कराटे (बसपा), एकनाथ तळवाडे (भाजपा), साहेबराव बर्डे ( राष्ट्रवादी कॉँग्रेस), अंकुश मोरे (कॉँग्रेस), प्रभाग क्र.६- सीताबाई कापसे (शिवसेना), सुरेखा गोसावी (अपक्ष), शंकुतला धारराव ( राष्ट्रवादी कॉँग्रेस), रोहिणी परदेशी (कॉँग्रेस), विमल पवार (बसपा), मंगला वाघ (भाजपा), प्रभाग क्र.७- किरण कापसे (अपक्ष), चैतन्य कापसे (कॉँग्रेस), रमेश कापसे (अपक्ष), डॉ. भूषण राठी (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सचिन गिते (शिवसेना), प्रभाग क्र.८ -उमाकांत अहेरराव (अपक्ष), रमेश जाधव (राष्ट्रवादी कॉँग्रेस), हसन युसूफ शेख (अपक्ष), मुकुंद होळकर (शिवसेना), प्रभाग क्र.९- शीतल कुंदे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सुनीता कुंदे (शिवसेना), धन्वंतरी नवले (कॉँग्रेस), प्रभाग क्र.१०- नंदकिशोर कापसे (कॉँग्रेस), अनिल कुंदे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), माणिक कुंदे (भाजपा), संजय लुंकड (अपक्ष), प्रभाग क्र.११- चारूशीला कर्डिले (भाजपा), चित्रा जेऊघाले (शिवसेना), दीपा तनपुरे (अपक्ष), नलिनी नागरे (कॉँग्रेस), पद्मा व्यवहारे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), विमल सोमवंशी (अपक्ष), प्रभाग क्र.१२-दिलीप कापसे (भाजपा), देवदत्त कापसे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), नंदू कापसे (अपक्ष), प्रभाग क्र.१३-संतोष कर्डिले (अपक्ष), प्रसाद भुजबळ (अपक्ष), अविनाश राऊत (बसपा), विक्रम रंधवे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), मधुकर शेलार (कॉँग्रेस), राजाराम शेलार (भाजपा), प्रभाग क्र.१४- सीमा घटमाळे (शिवसेना), सिरीन आरिफ मनियार (राष्ट्रवादी कॉँग्रेस), कौसर हसन शेख (अपक्ष), प्रभाग क्र.१५-अंजना खडताळे (अपक्ष), पद्मा खडताळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सुनीता खडताळे (भाजपा), नयना निकाळे (कॉँग्रेस), प्रभाग क्र.१६- सचिन खडताळे (बसपा), विजय झोटिंग (राष्ट्रवादी कॉँग्रेस), आनंद बिवाल (शिवसेना), परशराम साठे (कॉँग्रेस), प्रभाग क्र.१७मधून स्वाती गाजरे (अपक्ष), भाग्यश्री सुराणा (अपक्ष), वनमाला सुराणा (भाजपा), माधुरी कापसे (अपक्ष). निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस १६, कॉँग्रेस १०, शिवसेना १०, भाजपा ९, बसपा ५ जागांवर निवडणूक लढवत आहे. प्रभाग क्रमांक ६ आणि ११ मध्ये शिवसेनेने भाजपा समोर उमेदवार उभे केले असून, उर्वरित ठिकाणी सेना, भाजपा युतीचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक सातमध्येही शिवसेनेने उमेदवार दिला आहे. एबी फॉर्म दिलेला असतानाही कॉँग्रेसच्या दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे. (वार्ताहर)
निफाडला ६८ उमेदवार रिंगणात
By admin | Published: October 20, 2015 12:00 AM