भुसावळ येथून येणारी हुतात्मा एक्स्प्रेस निफाड रेल्वे स्टेशनवर पुण्याला जाण्यासाठी पहाटे ४.३० वा येईल व परतीच्या वेळी पुण्याहून निफाड रेल्वे स्टेशनला सायं ६.२० वा. दाखल होईल. या एक्स्प्रेसमुळे निफाड तालुक्यातील प्रवाशांना पुण्याला जाणे सोयीचे झाले आहे.
निफाड : अनेक वर्षांपासून प्रवाशांची मागणी असलेली पुणे-भुसावळ (हुतात्मा) एक्स्प्रेस रविवारी सायंकाळी निफाड स्थानकात दाखल झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करीत स्वागत करण्यात आले.हुतात्मा एक्स्प्रेसला निफाड रेल्वे स्टेशनला थांबा द्यावा, अशी अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली. रविवारी निफाड रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी हुतात्मा एक्स्प्रेसच्या चालकांचा सत्कार केला.यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते सुरेश पाटील उपस्थित होते. हुतात्मा एक्स्प्रेसमुळे निफाड तालुक्यातून पुणे आणि भुसावळकडे प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी कुंदेवाडी ग्रामस्थांच्या वतीने खासदार चव्हाण व पाटील यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्तविक सुनील कुमावत यांनी केले. या प्रसंगी खासदार चव्हाण, पाटील, रेल्वे विभागाचे कुंदन महापात्रा,नितीन पांडे,बापू पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. वैकुंठ पाटील, संजय वाबळे, निफाडचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, सरपंच सरोज घेगडे, लक्ष्मण निकम, संजय गाजरे, नितीन जाधव, स्टेशन मॅनेजर कुसले, विजय बोरा, नंदू बोरा, नंदलाल बाफना, प्रवीण तनपुरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.