शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

निफाडच्या नगरसेवकाची २० लाख रुपयांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 11:54 PM

निफाड : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या खटल्यात चांगला वकील देतो व तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देचांगला वकील लावून तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून उकळले पैसे

निफाड : मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या जमिनीच्या खटल्यात चांगला वकील देतो व तुमच्या बाजूने निकाल लावून देतो, असे सांगून २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी निफाड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत निफाडचे नगरसेवक किरण कापसे यांच्या फिर्यादीवरून निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. किरण कापसे यांची वडनेरभैरव येथील जमिनीच्या व्यवहाराची केस मुंबई उच्च न्यायालयात दाखल होती. या दरम्यान पंकज श्रीपादराव होळकर ( राहा. पिंपळगाव बसवंत ) यांनी किरण कापसे यांना न्यायालयाच्या आवारात भेटून केसचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो त्यासाठी चांगल्या वकिलाची नेमणूक करण्यासाठी ३० लाख रुपये लागतील, असे सांगून विश्वास संपादन केला.यावेळी किरण कापसे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये १५ लाख आरटीजीएसने व पाच लाख रुपये रोख असे एकूण २० लाख पंकज होळकर यांना दिले. त्यानंतर किरण कापसे यांनी वकिलांची भेट घालून द्या, असे म्हटल्यावर पंकज होळकर यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केल्याने किरण कापसे यांना आपण फसलो गेल्याचे समजले. कापसे यांनी पंकज होळकर यांच्याकडे पैसे मागितले तेव्हा होळकर यांनी पाच लाख रुपये किरण कापसे यांच्या बँक खात्यावर जमा केले व उर्वरित १५ लाख रुपयांचे चेक दिले. मात्र ते चेक बँकेत वठले नाही. जमिनीच्या प्रकरणाबाबत वकील लावून देण्यासाठी पंकज होळकर यांनी २० लाख रुपये घेऊन कोणताही वकील दिला नाही व माझी फसवणूक केली आहे, अशा आशयाची फिर्याद किरण कापसे यांनी निफाड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून निफाड पोलिसांनी संशयित पंकज होळकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेCrime Newsगुन्हेगारी