नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात वाढलेल्या थंडीने नाशिककरांना हूडहूडी भरलेली असताना गुरुवारी पुन्हा तापमानाने किमान तापमानाचा नवा विक्रम नोंदवला. नाशिक शहरातील तापमान ८.६ तर निफाड येथील तापानाने थेट ४.४ हा आकडा गाठला. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या गारव्यामुळे नाशिकमध्ये नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नाशिक शहरात किमान तापान ८.६ तर कमाल तापमान २७.७ इतकी कमाल तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली.
शहरात ही स्थिती असताना ग्रामीण भागातील निफाड तालुक्यातही ४.४ इतके तापमान नोंदवण्यात आल्याने निफाडचे तापमान सर्वांत कमी असल्याची नोंद जिल्ह्यात झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे वाहू लागल्याने नाशिकमधील किमान तापमानात अचानक घट झाली आहे. मंगळवारी पारा ९ अंशावर जाऊन पोहोचला आहे. थंडीमुळे नाशिककर चांगलेच गारठले आहेत.
निफाड @ ४.४निफाड तालुक्यात कृषी संशोधन केंद्रात गुरुवारी ४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मागच्या आठवड्यात निफाडला ५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दरम्यान, गुरुवारी निफाडला या हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.