निफाड : शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने केंद्र सरकारच्या तीन तलाक विधयकाविरोधात मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा निफाड तहसील येथे काढण्यात आला. निफाडच्या निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना याप्रश्नी निवेदन देण्यात आले. प्रारंभी निफाड शहरातील जामा मस्जीद येथून सकाळी अकरा वाजता मुस्लीम समाजातील महिलांनी मोर्चास प्रारंभ केला. हा मूक मोर्चा शनिमंदिर, शिवाजी चौक मार्गे तहसील कचेरीवर आला. निफाडच्या नगरसेवक नूरजहाँ पठाण, शिरीन मणियार, अफरोज शेख, रजिया राजे, अलविरा पठाण यांनी निफाडच्या नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना निवेदन दिले. यावेळी शहरातील मुस्लीम महिलांची मोठी उपस्थिती होती. सदरच्या मोर्चात बसपाचे जिल्हाध्यक्ष आसिफ पठाण, इरफान सय्यद, तौसिफ मन्सूरी, तनवीर राजे, दबीर पटेल, जावेद शेख, शकील पठाण, अय्यूब पठाण, आरीफ मणियार, शाकीर शेख, वासिम पठाण, अमजद शेख, हाजी मलंग,आसिफ अनसारी, लाला पठाण, सलीम सय्यद, असलम शेख, वकील शेख, पापा पठाण, हाजी शेख, दिलावर तांबोळी, फिरोज इनामदार, वसीम मन्सुरी, बबडी मुल्ला, अनीस शेख, वसीम तंबोली, मोईन पठाण, तौसिफ शेख, नाजिम शेख, शकील शेख आदींसह मुस्लीम समाजातील महिला, नागरिक सहभागी झाले होते.
निफाडला तीन तलाक विधेयकाविरोधात महिलांचा मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:12 AM
निफाड : शहरातील मुस्लीम समाजाच्या वतीने केंद्र सरकारच्या तीन तलाक विधयकाविरोधात मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा निफाड तहसील येथे काढण्यात आला. निफाडच्या निवासी नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर यांना याप्रश्नी निवेदन देण्यात आले. प्रारंभी निफाड शहरातील जामा मस्जीद येथून सकाळी अकरा वाजता मुस्लीम समाजातील महिलांनी मोर्चास प्रारंभ केला. हा मूक मोर्चा शनिमंदिर, ...
ठळक मुद्देअकरा वाजता मुस्लीम समाजातील महिलांनी मोर्चास प्रारंभ शहरातील मुस्लीम महिलांची मोठी उपस्थिती