निर्गुडपाडा व कोटमवाडी ही विद्युत रोहित्रच्या समस्येने दोन महिन्यापासून अंधारात होती.अनेक अडचणी व संकटाचा सामना केल्यानंतर वेळोवेळी पाठपुरावा केल्यावर महावितरण विभागाने या वाड्यांसाठी नवीन ४० के.व्ही.पॉवर असलेला विद्युत रोहित बसविला. थ्री फेज पुरवठा नसतानाही महिनाभर वेळ निभावली. परंतू, विद्युत रोहित्रावर अतिरिक्त ताण वाढल्याने विजेच्या कमी जास्त दाबामुळे विद्युत रोहित्र जळाले. त्यामुळे कोटमवाडी व निर्गुडपाडा ही दोन गावे चार ते पाच दिवसांपासून अंधारात असल्याने नागरिकांना विजेअभावी विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विजेअभावी उपकरणे बंद असल्याने अनेक कामांवर विपरीत परिणाम झाला आहे. एक ते दीड महिन्यांपासून थ्री फेज वीज वाहिनी मिळत नसल्याने पिठाची गिरणी बंद अवस्थेत असून येथील आदिवासी महिलांना दहा ते बारा किलोमीटर दळणासाठी पायपीट करावी लागत आहे. तसेच साप, विंचू यांसारख्या सरपटणा-या प्राण्यांपासून नागरिकांना धोका संभवतो. वारंवार येणा-या विजेच्या समस्येवर नागरिक नाराज असून महावितरणाच्या या वेळकाढूपणावर संताप व्यक्त केला आहे.
रोहित्र जळाल्याने निर्गुडपाडा, कोटमवाडी पुन्हा अंधारात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 5:57 PM
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेहर्षे गावालगत असलेल्या निर्गुडपाडा व कोटमवाडी या दोन वाड्यांना संयुक्तपणे असलेला विद्युत रोहित्र विजेच्या कमी-जास्त दाबाने पुन्हा जळाल्याने येथील नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यात दुसऱ्यांदा ही वेळ आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मात्र,महावितरण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून लोकप्रतिनिधींनीही पाठ फिरवली आहे.
ठळक मुद्देनागरिक संतप्त : लोकप्रतिनिधींनीही फिरविली पाठ