त्र्यंबकेश्वर : ठाणे पाटबंधारे विभागाने वैतरणा खोºयाचा राज्य जलविकास आराखड्यामुळे मुंबईचे हित जोपासताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी जनतेवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ‘हर खेत को पानी’ ही केवळ घोषणाच राहिली असल्याचे आमदार निर्मला गावित यांनी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना सुनावले. वास्तविक वैतरणा प्रकल्प नाशिक जिल्ह्यात आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अस्वली हर्ष, टाके-देवगाव येथील पाटबंधारे प्रकल्पांना कालवे नाहीत. त्यामुळे आदिवासी बांधव उपसा सिंचन योजनांपासून वंचित राहतात. तयार केलेला हा आराखडा आदिवासी जनतेवर अन्याय करणारा आहे. येथे उपसा सिंचन योजना राबविणे शक्य आहे. त्याचा जल आराखड्यात समावेश केलेला नाही. जलयुक्त शिवार योजना राज्यभर सुरू आहे. त्यात प्रत्येक गावाला पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी राखीव पाण्याचे फेरसर्वेक्षण करून नियोजनबद्ध अशा जल आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी आमदार गावित यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
‘त्या’ आराखड्यामुळे त्र्यंबकवर अन्याय निर्मला गावित : पाटबंधारे खात्याच्या अभियंत्यांना खडसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2018 11:27 PM