Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अधिकृत आखाड्यांसाठी प्रमुख महंत आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी प्रशासन सिंहस्थासंदर्भात अनधिकृत व्यक्तींशी चर्चा करत असल्याचा आरोप करत निर्मोही अनि आखाड्याचे महंत राजेंद्र दास प्रशासनावर संतप्त झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'यापुढे अधिकृत व्यक्तींशी चर्चा करावी अन्यथा पुढे येणाऱ्या समस्यांची जबाबदारी प्रशासनाची असेल', असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही वाचा >>त्र्यंबकेश्वरला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा; नगरविकास विभागाने जारी केला शासन निर्णय
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू झाल्यानंतर प्रशासन कामाला लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात त्र्यंबकेश्वर येथे आखाड्याच्या साधूनी सिंहस्थाबाबत चर्चा केली. तर नाशिकमध्ये आखाड्यांशी संबंध नसलेल्या काही धार्मिक व्यक्तींशी प्रशासनाने चर्चा केली.
याची माहिती मिळाल्यानंतर निर्मोही अनि आखाड्याचे महंत राजेंद्र दास यांनी गुजरातमधून यासंदर्भात माध्यमांकडे नाराजी व्यक्त केली.
...तर प्रशासन जबाबदारी असेल
आखाड्यांचे अधिकृत साधू दूरवरून नाशिकमध्ये येत असतात. त्यांच्या समस्या वेगळ्या असतात. त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय त्याचे निरसन होऊ शकत नाही. त्यामुळे सिंहस्थासंदर्भात चर्चा करताना आखाड्याच्या व्यक्तींनाच सहभागी करून घ्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आखाड्याशी संबंध नसलेल्या 3 व्यक्तींशी चर्चा करून सिंहस्थाची व्यवस्था केली आणि त्यानंतर काही समस्या उद्भवल्यास त्याची जबाबदारी पूर्णतः प्रशासनाची असेल. ते टाळण्यासाठी प्रशासनाने आखाड्यांच्या प्रमुखांनाच प्राधान्य द्यावे.