नाशिक : मुकुट सप्तमीनिमित्त दिगंबर जैन संप्रदायाचे २३ वे तीर्थंकर भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण दिवस रविवारी (दि.२६) भाविकांनी घरीच सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार करून उत्साहात साजरा करण्यात आला.जैन शास्त्रानुसार भगवान पार्श्वनाथ यांचा निर्वाण झारखंड येथील सम्मेद शिखरजी येथे झाला असून, या दिवशी लाखोंच्या संख्येने भाविक तेथे जातात. परंतु कोरोनाच्या काळात सरकारी नियमांमुळे कोणीही तेथे जाऊ शकले नाही. त्यामुळे णमोकार तीर्थ येथे वास्तव्यास असलेले प.पू. आचार्य श्री देवनन्दीजी गुरुदेव यांनी महाराष्ट्रातील भाविकांना केलेल्या आवाहनानुसार सर्वांनी आपल्या घरीच सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार करून भावदर्शनचा आनंद घेतला. नाशिक जिल्ह्यातील आरुष कासलीवाल हा केवळ अकरा वर्षांचा असून, त्याने दोन दिवसांतच शिखरजींची प्रतिकृती तयार केली आहे. आचार्य श्री देवनन्दिजी गुरुदेव यांच्या आवाहनामुळेच आपल्याला प्रेरणा मिळाल्याची प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे.स्पर्धेतील विजेतेआचार्य देवनन्दीजी यांनी केलेल्या आवाहनानुसार, अनेक लोकांनी आपापल्या घरात सम्मेद शिखरजी पहाडाची प्रतिकृती तयार केली होती. यात मुंबईच्या दीपाली जैन यांनी प्रथम, चांदवड येथील आरुष भूषण कासलीवाल यांनी द्वितीय क्रमांक व औरंगाबादच्या काश्मिरा लोहाडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला असून, औरंगाबादच्या पायल लोहाडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
शिखरजींची प्रतिकृती उभारून निर्वाण महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:36 AM