सरपंच व उपसरपंच निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब निफाडे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित सदस्यांची बैठक संपन्न झाली विहित मुदतीत सरपंचपदासाठी निशा पाठक, तर उपसरपंचपदासाठी रश्मी बोरगुडे यांचेच प्रत्येकी एकमेव नामनिर्देशनपत्र प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी निफाडे यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. यावेळी झालेल्या सभेस ग्रामपंचायत सदस्य नवनाथ बोरगुडे, राजेंद्र बोरगुडे, रमजान पठाण, दादा बोरगुडे, मोतीराम भवर, सोनाली घायाळ, गायत्री बोरगुडे, मनीषा गवारे, विकास पवार, यांच्यासह कामगार तलाठी गांगुर्डे, ग्रामसेवक दहीफळे, कोतवाल बाळासाहेब खरे, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी हे उपस्थित होते. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित सरपंच निशा पाठक, उपसरपंच रश्मी बोरगुडे यांचा सत्कार करण्यात आला.
नैताळे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्या श्री मतोबा महाराज ग्रामविकास पॅनलला १३ पैकी १० जागांवर विजय मिळाला होता.
नैताळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निशा पाठक, तर उपसरपंचपदी रश्मी बोरगुडे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर जल्लोष करताना सदस्य व ग्रामस्थ. (२६ नैताळे०)