शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

निसाकातील कारभाराच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:13 AM

महाराष्टतील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या लागत असल्याने कारखान्याच्या या साºया परिस्थितीस जबाबदार असलेल्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय साखर सहसंचालकांनी घेतला असून, तसे आदेश त्यांनी विशेष लेखा परीक्षकास दिले आहेत.

नाशिक : महाराष्टतील प्रगत म्हणून एकेकाळी ओळख असलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या वेळोवेळच्या संचालक मंडळाने केलेला भ्रष्टाचार, उधळपट्टी व अनियमित कामकाजामुळे गेल्या चार वर्षांपासून कारखाना बंद पडला असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यामुळे आत्महत्या कराव्या लागत असल्याने कारखान्याच्या या साºया परिस्थितीस जबाबदार असलेल्या कारभाराची चौकशी करण्याचा निर्णय साखर सहसंचालकांनी घेतला असून, तसे आदेश त्यांनी विशेष लेखा परीक्षकास दिले आहेत. यासंदर्भात ऊस उत्पादक शेतकरी भाऊसाहेब पंढरीनाथ गडाख यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, सहकारमंत्र्यांकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीत गडाख यांनी म्हटले आहे की, चार वर्षांपासून कारखाना बंद पडला असून, दीड हजार कारखाना कर्मचाºयांची उपासमार होत आहे. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे उत्पादन बंद झाले आहे. ३५ हजार सभासदांचे करोडे रुपयांचे भाग भांडवल बुडीत झाले आहे. कारखान्यावर ३०० कोटी रुपयांचा बोजा आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून कारखाना परिसरातील ५४ शेतकºयांनी आजवर आत्महत्या केल्या आहेत. या साºया बाबींना त्या-त्या वेळचे कारखान्याचे संचालक व अधिकारी जबाबदार आहेत. निफाड कारखान्याची ऊस क्षेत्राची उपलब्धता विचारात घेता निसाकाची गाळप क्षमता प्रतिदिन १२०० टनावरून ४००० टन करणे उपयुक्त व व्यवहार्य होते काय याची चौकशी करावी, गाळप क्षमता वाढविण्यासाठी मशीनरी व सामग्री खरेदी नियमानुसार झाली काय, गाळप क्षमता वाढविल्यामुळे पुरेसा ऊस उपलब्ध होत नसल्याने कारखाना दररोज चार तास नो केन होत होता त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नुकसानीस जबाबदार असलेल्यांची चौकशी व्हावी, निसाकाइतकी गाळप क्षमता असलेल्या खासगी कारखान्यात ४०० कर्मचारी काम करतात, तर निसाकात १५०० कामगारांची आवश्यकता होती काय, निसाकाने सन २००८ ते २०१२ या कालावधीत ८५० ते ९०० प्रतिक्विंटल दराने साखरेची विक्री केली त्याच वेळी साखरेचा दर २७०० ते ३००० प्रतिक्विंटल इतका झाला होता त्यामुळे कारखान्याला १०० कोटींचा फटका बसला. या साखर घोटाळ्याची चौकशी करावी. सन २००३ ते २००६ या कालावधीत चेकने साखर विक्री करण्यात आली, त्यातील अनेक चेक न वटताच परत आले व कारखान्याचे नुकसान झाले त्यास जबाबदार असलेल्यांची चौकशी करावी.१९९७ पासून गैरकारभार ऊस उत्पादक गडाख यांनी केलेल्या तक्रारीनुसार, निसाका हा सन १९९७ पासून पुढील संचालकांच्या उधळपट्टीमुळे अवास्तव खर्चामुळे, भ्रष्टाचारामुळे व अनियमित कामकाजामुळे डबघाईस येऊन बंद पडल्याने तेव्हापासूनच्या कारखान्याच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाय कारखान्याशी संलग्न कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण सोसायटी या संस्थेच्या स्थापनेमध्ये कारखान्याच्या सभासदांचे मोठे योगदान असताना कालांतराने ती शैक्षणिक संस्था बाळासाहेब देवराम वाघ यांच्या कुटुंबीयांचे खासगी विश्वस्तांची कशी झाली याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  या तक्रारीची दखल घेत साखर संचालकांनी प्रादेशिक सहसंचालकांना तातडीने महाराष्टÑ सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले व त्याआधारे विशेष लेखा परीक्षकांना प्रत्येक मुद्द्यावर सखोल चौकशी करून अहवाल पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने