नांदूरवैद्य : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नितीन किसन काजळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच उषा रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत आवर्तन पद्धतीने उपसरपंच पद रिक्त होते. निर्धारित वेळेत नितीन काजळे यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही अर्ज न आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास सरपंच उषा रोकडे यांनी काम पाहिले. ग्रामपंचायतींच्या सरपंच उषा रोकडे, ग्राम अधिकारी किरण शेलावणे, अॅड. चंद्रसेन रोकडे व सर्व पदाधिकार्यांनी काजळे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी उपसरपंच पोपटराव दिवटे, ग्रामपंचायत सदस्य केशव डोळस, रमेश रोकडे, उज्ज्वला हारदे, ललिता काजळे, सविता काजळे, वैशाली मुसळे, कविता मुसळे, काशिनाथ तांबे, कुंडलिक मुसळे, लक्ष्मण मुसळे, पंढरीनाथ मुसळे, राजू रोकडे, सुकदेव दिवटे, माजी सरपंच संतू सायखेडे, सुर्यभान काजळे, वामनराव काजळे, मनोहर काजळे, संतोष भागवत, सुरेश काजळे, मारूती डोळस, माधव कर्पे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
नांदूरवैद्यच्या उपसरपंचपदी नितीन काजळे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 3:35 PM