नाशिक : महापालिकेने संत निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत यंदा न करण्याच्या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका स्वागत करणार नसेलच तर अनेक राजकीय पक्ष, नगरसेवक आणि खुद्द संत निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत समितीच्या वतीने ढोल, ताशे लावून स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान, स्वागत समिती येत्या १५ तारखेला आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेटही घेणार आहे. उच्च न्यायालयाने मीरा-भार्इंदर महापालिकेच्या विरोधात दिलेल्या निर्णयानुसार राज्य शासनाने परिपत्रक पाठवून राज्यातील सर्व महापालिकांना अवगत केले आहे. त्यानुसार सण आणि उत्सव हे जर महापालिकेच्या बांधील कर्तव्य किंवा ऐच्छिक कार्यात समाविष्ट नसतील तर त्यावर खर्च केला जाणार नाही, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. येत्या २९ जून रोजी नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी स्थानिक स्वागत समितीने दरवर्षीप्रमाणे महापालिकेला पत्र दिले होते; मात्र शासनाच्या पत्राचा हवाला देत मनपाने यंदा स्वागत सोहळ्यास नकार दिला असून, तसे पत्र स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांना दिले आहे. महापालिकेच्या या निर्णयाचे शहरात पडसाद उमटले असून, अनेक राजकीय पक्ष आणि नगरसेवकांनी स्वागत समितीशी संपर्क साधून स्वागत सोहळ्याची तयारी दर्शविली आहे. यात शाहू खैरे, जगदीश पाटील, राष्टÑवादीचे रंजन ठाकरे यांचा समावेश आहे. यासंदर्भात, स्वागत समितीचे अध्यक्ष पद्माकर पाटील यांनीदेखील समितीच्या वतीने पालखीचे बॅँड बाजा लावून स्वागत करण्यात येईल, असे सांगितले आहे. अर्थात, पालखी प्रमुखांना भेटवस्तू म्हणून टाळ मृदंगसारखी साधने महापालिका यापूर्वी भेट म्हणून देत होती, त्याप्रमाणे देता येणार नाही; मात्र अल्पोपाहार आणि इतर व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महापालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदाही रमजान ईद निमित्ताने गोल्फ क्लबवर नमाजपठणासाठी स्वागताचे शेड बांधणार नसल्याचे स्पष्ट केल्याने त्याविषयीदेखील तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. तथापि, महापालिकेच्या वतीने नेहमीप्रमाणे पाणीपुरवठा आणि अन्य सुविधा मात्र दिल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.महापालिका म्हणते, पाणीपुरवठा करणारचउच्च न्यायालयाचा आदेश ताजा असून, त्यानुसार राज्य शासनाने पत्र पाठविले आहे. त्यानुसार महापालिकेने स्वागत समितीला पत्र पाठविले आहे. महापालिकेच्या वतीने मंडप आणि भेट म्हणून ज्या वस्तू दिल्या जात होत्या, त्या दिल्या जाणार नसल्या तरी पाणीपुरवठा अन्य सुविधा मात्र दिल्या जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. रमजान ईदच्या दिवशी गोल्फ क्लब मैदानावर नेहमीप्रमाणे पाणीपुरवठ्याची व्यवस्था असणार आहे. याठिकाणी मंडप टाकण्याची सुविधा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देण्यात येत होती. डॉ. प्रवीण गेडाम यांनी ही पद्धत सुरू केली होती.तीने ते चार लाख होतो खर्चमहापालिकेच्या वतीने गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून म्हणजेच महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाल्यापासून संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात येऊ लागले. सुरुवातीला वारकऱ्यांची संख्या कमी होती. त्याचप्रमाणे फक्त स्वागत आणि अल्पोपाहार दिला जात होता आता मात्र, काही वर्षांपासून टाळ, चिपळ्या, मृदंग, टेन्ट तसेच गेल्या वर्षी तर चार्जेबल बॅटºया देण्यात आल्या होत्या. या सर्वांसाठी अवघा तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. त्यातही अल्पोपाहार एका केटरर्सकडून मोफत दिला जात असतो.यंदा मागितली होती तुकारामाची गाथामहापालिकेच्या वतीने यंदा पालखी प्रमुखांना ज्ञानेश्वरी आणि तुकारामाची गाथा भेट द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती; परंतु पालिकेने खर्च रद्द केल्याने आता ती संंबंधितांना देता येणार नाही.
निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत होणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 1:25 AM