ऑनलाइन लोकमतमालेगाव (नाशिक), दि. 26 - मालेगाव महापालिकेत आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने 11 जागांवर विजय मिळविला असून 30 जागांवर आघाडी घेतली आहे.
तर नऊ जागांवर शिवसेनेने आघाडी घेतली आहे. मतमोजणी सुरू असून मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. प्रभाग 16 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार आघाडीवर आहे.
प्रभाग 5 मधून काँग्रेसचे नजीर अहमद इरशाद अहमद, जैबुन्नीसा नुरूल्लाह, कमरून्नीसा मोहम्मद रिझवान आणि फकीर मोहम्मद शेख सादिक विजयी झाले आहेत.
याठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये चुरशीचा सामना पाहायला मिळत आहे. मतमोजणी केंद्रांभोवती उमेदवारांनी समर्थकांसह गर्दी केली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी मालेगाव महानगरपालिकेसाठी 60 टक्के मतदान झाले होते.
सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला असून कॅम्परोडच्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नवीन इमारतीत १, २, ८, ९, १०, ११ या प्रभागांची, शिवाजी जिमखान्यात १२, १५, १७, १८, २० व २१ या प्रभागांची, तालुका क्रीडा संकुलात ५, ६, ७, जाखोट्या भवनात १४, १६, १९ तर श्रीकृष्ण लॉन्समध्ये ३, ४, १३ या प्रभागांच्या मतमोजणीस प्रारंभ झाला आहे.
सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आकडेमोड करण्यात व्यस्त झाले असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
LIVE UPDATES
प्रभाग 19 ब : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बेग शाहीन मन्नान बेग या अवघ्या 25 मतांनी पराभूत झाल्याने फेर मतमोजणीची मागणी. निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी मागणी मान्य केल्याने थोड्याच वेळात होणार फेरमतमोजणी.
मालेगावचे विद्यमान महापौर हाजी मो इब्राहिम यांचा दारुण पराभव
मालेगाव (नाशिक) - प्रभाग 14 मध्ये चारही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी
मालेगाव (नाशिक जिल्हा ) महापालिका
एकूण जागा - 84
बिनविरोध - 01 ( काँग्रेस)
जाहीर झालेले निकाल
राष्ट्रवादी काँग्रेस - 11
जनता दल - 5
काँग्रेस - 4
आघाडी
काँग्रेस - 30
राष्ट्रवादी काँग्रेस - 24
शिवसेना - 9
भाजपा - 3
एमआयएम - 11
इतर - 3