नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून आश्चर्यकारकरीत्या बेपत्ता झालेले महापालिकेचे सहायक अभियंता रवि पाटील हे अद्यापही बेपत्ताच असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पाटील हे रेल्वेने कुठेतरी गेले असल्याची शक्यता गृहित धरून रेल्वे पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली असल्याचे समजते. शनिवार, दि. २६ रोजी सहायक अभियंता रवि पाटील (४२) हे महापालिकेच्या कामासाठी पहाटे घराबाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्यांच्या पत्नीला घराबाहेरच त्यांची कार उभी असल्याचे आणि त्यामध्ये त्यांचा मोबाइल, पाकीट तसेच एक चिठ्ठी आढळली होती. कार्यालयीन कामकाजाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याच्या मजकूर या चिठ्ठीत लिहला असल्याने त्यांच्या पत्नी शीतल पाटील यांनी तत्काळ गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेत पती रवि पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली असून, रविवारी संध्याकाळपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता. याप्रकरणी तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पोलिसांच्या तीन पथकांमार्फत शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा अद्याप तपास लागलेला नाही मात्र त्यांच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा आणि रेल्वे पोलीसदेखील प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले. पाटील यांना शनिवारी सकाळी रेल्वेस्थानकावर पाहण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी रेल्वेला याबाबतची माहिती कळविली असून, रेल्वेपोलीस स्थानकांवरील सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतआहे. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांचीदेखील मदत घेतली जात आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वॉक विथ कमशिनर या कार्यक्रमाला जाण्यासाठी पाटील शनिवारी सकाळी घराबाहेर पडले ते परतलेच नाही.कुटुंबीय चिंतितअभियंता पाटील हे चिठ्ठी लिहून बेपत्ता झाल्याने कुटुंबीय चिंतित असले तरी पाटील हे शांत स्वभावाचे असल्याने ते कोणतेही टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला आहे. कुटुंबीयांकडून मिळणाºया माहितीवरून तपास वेगाने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महापालिकेचे सहायक अभियंता पाटील अद्यापही बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:09 AM