नाशिक : महापालिकेच्या तारांगणला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर येथील आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपयांचे सायन्स सेंटरसाकारण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु विभागीय आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवून अनेक वर्षे झाली तरी हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या वतीने आता अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे.नाशिक महापालिकेने त्र्यंबकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर तरणतलावाजवळ तारांगण साकारले आहे त्याचवेळी याठिकाणी सायन्स पार्कदेखील साकारण्याची योजना होती, मात्र ती मागे पडली. तारांगण हे व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवले न गेल्याने त्याची दुरवस्था झाली होती. गेल्या वर्षभरात नूतनीकरण करून ते पुन्हा रुळावर आणण्यात आले आहे. तथापि, नाशिक पूर्वचे आमदार अॅड. उत्तमराव ढिकले यांच्या आमदार निधीतून याठिकाणी सायन्स पार्क साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.ढिकले यांनी आपल्या मतदारसंघात नाट्यगृह बांधण्यासाठी निधी मंजूर करून घेतला होता. मात्र दोन कोटी रुपयांमध्ये नाट्यगृह साकारू शकत नसल्याने हा निधी परत जाण्यापेक्षा महापालिकेकडे वर्ग करून सायन्स सेंटर उभारण्याचे ठरविण्यात आले.आता टिंकरिंग लॅबमहापालिकच्या तारांगणच्या तळघरात मोठ्या प्रमाणात जागा आहे. तेथे यापूर्वीही सायन्स पार्क तयार करण्याचा प्रस्ताव होता. मात्र सदोष बांधकामामुळे पावसाचे पाणी तेथे शिरत असल्याने तो बारगळला होता. आता विद्यमान मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी याठिकाणी अटल टिंकरिंग लॅब उभारण्याची तयारी पूर्ण केली आहे.
महापालिकेचे सायन्स सेंटर लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 1:28 AM
महापालिकेच्या तारांगणला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर येथील आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने आमदार निधीतून सुमारे दोन कोटी रुपयांचे सायन्स सेंटरसाकारण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु विभागीय आयुक्तालयाकडे प्रस्ताव पाठवून अनेक वर्षे झाली तरी हा प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही. दरम्यान, महापालिकेच्या वतीने आता अटल टिंकरिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देप्रशासकीय घोळ : आमदार निवर्तले, परंतु कामाला मंजुरी नाही