शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

मनपाचे तीन तरणतलाव सुरू

By admin | Published: August 07, 2016 1:50 AM

पावसाने दिलासा : सावरकर तरणतलाव मंगळवारपासून खुला

नाशिक : शहरात समाधानकारक पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने महापालिकेने गेल्या चार महिन्यांपासून पूर्णवेळ बंद ठेवलेले जलतरणतलाव पुन्हा खुले करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार सिडको, सातपूर आणि नाशिकरोड येथील तरणतलाव दि. २ आॅगस्टपासून सुरू झाले आहेत, तर त्र्यंबकरोडवरील वीर सावरकर जलतरणतलाव येत्या मंगळवार (दि.९)पासून खुला करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता उत्तम पवार यांनी दिली.शहरात पाणीकपात सुरू असतानाच राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या सूचनेनुसार महापालिकेने आपले पाचही जलतरणतलाव दि. २१ मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. महापालिकेने नाशिक पश्चिम विभागातील वीर सावरकर तरणतलाव, नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय तरणतलाव, सिडकोतील स्वामी विवेकानंद तरणतलाव, सातपूर येथील क्लब हाउसमधील तरणतलाव आणि पंचवटीतील श्रीकांत ठाकरे तरणतलाव पूर्ण वेळ बंद ठेवले होते. महापालिकेने ९ आॅक्टोबर २०१५ पासून शहरात एकवेळ पाणीपुरवठ्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली, त्याचवेळी मनपाच्या पाचही तरणतलावांतील सायंकाळचे सत्र बंद करण्यात आले होते. केवळ सकाळचे तीन सत्र चालविले जात होते. त्यानंतर २२ फेबु्रवारीपासून विभागवार जलशुद्धीकरणनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने दर सोमवारी साप्ताहिक सुटीसह दोन दिवस तरणतलाव बंद ठेवण्यात येत होता.