नाशिक : भारताचे १४वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक येथे मुक्कामी येत आहेत. ते गुरूवारी (दि.१०) सकाळपर्यंत शासकिय विश्रामगृहात थांबणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विश्रामगृहाच्या परिसरात पादचाऱ्यांपासून सर्वच प्रकारच्या वाहनचालकांना प्रवेश निषिध्द करण्यात आल्याचे उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सांगितले.रामनाथ कोविंद हे शासकीय विश्रामगृहात थांबणार आहे. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव विश्रामगृहाच्या परिसरात शासकिय सेवेतील वाहने वगळता अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे गडकरी सिग्नलकडून चांडक सर्कल आणि पर्यटन विकास महामंडळाकडून ईदगाह मैदान, जॉगींग ट्रॅकच्या परिसरात जाणाºया रस्त्यांवरील सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच या भागात पादचाऱ्यांनाही प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी गुरूवारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावा असे अधिसूचनेत म्हटले आहे. मुंबईनाक्याकडून चांडकसर्कलकडे येणारी वाहतूक मायकोसर्कलवरून पुढे मार्गस्थ होईल तसेच गडकरी चौकातून कोणत्याही दिशेने आलेले वाहन शासकिय विश्रामगृहाकडे जाणाºया रस्त्याचा वापर करणार नाही. वाहनचालकांनी चांडक सर्कलकडून जलतरण तलावमार्गे मायको सर्कलकडे रवाना व्हावे, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे पालन सर्व नागरिकांनी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शासकिय विश्रामगृहाच्या परिसरात प्रवेशास मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2019 8:30 PM
वाहनचालकांनी चांडक सर्कलकडून जलतरण तलावमार्गे मायको सर्कलकडे रवाना व्हावे, असे आदेशात म्हटले आहे.
ठळक मुद्देगुरूवारपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करावारामनाथ कोविंद हे बुधवारी (दि.९) सायंकाळी नाशिक येथे मुक्कामी येत आहेत